7th Pay Commission : पुढील महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (entral Government Employees) सरकार मोठी भेट देऊ शकते. केंद्र सरकार कर्मचार्‍यांचा जुलै महिन्यातील थकित डीए भरू शकते, असे वृत्त आहे.

यासोबतच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ही घोषणा केली जाऊ शकते. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना अद्याप डीएचे पैसे मिळालेले नाहीत. त्यांची थकबाकी भरण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

कोविड (Kovid) मुळे सरकारने डीए रोखून धरला होता. आता 18 महिन्यांची डीएची थकबाकी सरकार लवकरच देऊ शकते, असे बोलले जात आहे.

सरकार दोन लाख रुपये देऊ शकते –

सरकार कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकदाच 2 लाख रुपये टाकू शकते, असे बोलले जात आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या बँडनुसार डीए थकबाकीचे पैसे मिळतील. जर सरकारने डीएची थकबाकी भरली, तर लेव्हल 1 कर्मचार्‍यांची डीए थकबाकी 11880 ते 37000 रुपयांपर्यंत असू शकते. तसेच सरकार स्तर 13 कर्मचाऱ्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये DA थकबाकी म्हणून देऊ शकते.

DA वाढू शकतो –

जुलै महिन्यात सरकार (Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 ते 5 टक्के वाढ करू शकते. मात्र, सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, वाढती महागाई (Inflation) पाहता सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करून दिलासा देऊ शकते, असे मानले जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने डीए मिळत आहे. मार्चमध्ये सरकारने महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला होता.

नोकरदारांना फायदा होईल –

महागाईचे आकडे लक्षात घेऊन सरकारने कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला तर 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला डीए हा त्यांच्या आर्थिक सहाय्य वेतन (Financial Assistance Salary) संरचनेचा भाग आहे.