Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना त्यांच्याकडे पन्नास आमदार असल्याचा दावा केला आहे. माझा गट हीच खरी शिवसेना, असे पत्र ते राज्यपालांना देणार असल्याचे सांगण्यात येते.

मात्र, राज्यपाल भगसिंग कोश्यारी कोरोनाचा लागण झाल्याने रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे हे काम लांबणीवर पडणार असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात यालाही पर्याय आहेत.
राज्यपाल आजारी असल्यावर एक तर शेजारच्या राज्यातील राज्यपालांकडे सूत्रे दिली जातील.

किंवा हेच राज्यपाल व्हिडिओ कॉन्फन्सरद्वारे शिंदे व त्यांच्या गटाची भेट घेऊ शकतील. असे झाले तर शिंदे यांचे काम आणखी सोपे होणार आहे. त्यासाठी त्यांना सर्वांना घेऊन महाराष्टात येण्याची आणि शिवसेनेच्या येथील कार्यकर्त्यांचा रस्त्यावर होणाऱ्या विरोधाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.

पक्षांतर बंदी कायद्याची कारवाई टाळण्यासाठी शिंदे यांना ३७ हा जादूई आकडा हवा आहे. पण, शिंदे यांनी त्यांच्याकडे ५० आमदार असल्याचा दावा केला आहे. ‘माझा गट हीच खरी शिवसेना,’ असे सांगत शिंदे हे राज्यपालांकडे दावा करणार आहेत.