अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2021 चा बहुचर्चित सामना आज (24 ऑक्टोबर) रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारतीय संघाने आतापर्यंत टी -20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. दोन्ही संघ या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करणार आहेत.

दरम्यान हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून खेळला जाईल. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा सुपर-12 मधील हा पहिला सामना आहे. उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी भारताला सुपर -12 मध्ये पाच सामने खेळावे लागतील

असा असणार आहे भारतीय संघ :– रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

असा असणार आहे पाकिस्तानचा संघ :- बाबर आझम, रिझवान अहमद, फखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वासीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रॅाफ, हैदर अली.