अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- कोविड रुग्णांवर उपचारासाठी आॉक्सिजन पुरवठयासह अन्य सोईसुविधांनी परिपूर्ण असलेल्या 50 बेड क्षमतेच्या हॉस्पिटलचा शुभारंभ आज श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.

कमी कालावधीत अत्याधुनिक हॉस्पिटलची उभारणी केल्याबदल मंत्री महोदयांनी सर्व संबधितांचे अभिनंदन केले. कोविड बाधित रुग्णांवर आरोग्य यंत्रणेने योग्य उपचार करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदिप सांगळे, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघर्ष राजुळे, स्थानिक पदाधिकारी, नागरिक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते होते.