अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  कोरोना बरोबरच वाढत्या गुन्हेगारी व अवैध धंद्यामुळे संगमनेर तालुका हा नेहमीच चर्चेत आहेत असतो. यातच वाढत्या अवैध धंद्यांना वेळीच रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील कारवाया सुरूच असतात.

नुकतेच संगमनेर पोलिसांनी लाखो रुपयांचा अवैध गुटखा हस्तगत केला आहे, याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिल खलील शेख (वय 32) व खलील ताजमोहंमद शेख (वय 62, रा. जोर्वे रोड, संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि,

सदर दोघे जण नाशिकहून संगमनेरात एका कारमध्ये 1 लाख 27 हजार 200 रुपयांचा हिरा पान मसाला, 31 हजार 800 रुपयांची रॉयल तंबाखू असा मुद्देमाल नाशिकच्या दिशेने घेवून संगमनेरात येत होते.

याबाबतची माहिती समजताच पोलिसांनी सदर वाहन घुलेवाडी शिवारात पकडले. गुटखा, तंबाखू व तीन लाख रुपये किंमतीची कार असा एकूण 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत पोलीस नाईक सचिन उगले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जमिल शेख व खलील शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.