HAL Recruitment 2022 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL ने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी (Trade Apprentice Posts) अर्ज मागवले असून अर्जाची (application) प्रक्रिया 22 जुलै 2022 पासून सुरू सुरु झाली आहे.

hal-india.co.in या संकेतस्थळावर 10 ऑगस्टपर्यंत या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज (Online application) मागविण्यात आले आहेत. एचएएलच्या नाशिक विभागातील पदे भरती प्रक्रियेद्वारे भरली जातील. यामध्ये एकूण 455 पदांची भरती (recruiting) करण्यात आली आहे. रिक्त पदांविषयी सविस्तर खालीलप्रमाणे आहे.

फिटर 186
टर्नर 28
कारपेंटर 4
मशीनिस्ट 26
बिल्डर 8
इलेक्ट्रिशियन 66
मेकॅनिक 4
ड्राफ्ट्समन 6
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 8
पेंटर 7
COPA 88
शीट मेटल वर्कर 4
मशीनिस्ट 6
स्टेनोग्राफर 6
एसी मेकॅनिक 4

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 22 जुलै 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022
कागदपत्र पडताळणीची तात्पुरती तारीख – 16 ते 34 ऑगस्ट 2022

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील आयटीआय (ITI Trade) पदवी असणे आवश्यक आहे.

स्टायपेंड

भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांना पदांवर नियुक्ती मिळाल्यानंतर अप्रेंटिस कायदा 1961 च्या आधारे स्टायपेंड दिले जाईल. भरतीची सूचना तपासण्यासाठी आणि सर्व तपशील माहीत करून घेण्यासाठी उमेदवारांनी या लिंकवर क्लिक करण्याचा सल्ला दिला जातो.