मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे काढण्यावरून राज्यातील राजकारणात तीव्र वाद निर्माण होत आहेत, तसेच हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) सध्या जोरदार राजकारण सुरू आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी हनुमान चालीसावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे, नुकतेच नवनीत राणा व आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुंबईमध्ये (Mumbai) पत्रकार परिषद (Press conference) घेत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

यावेळी त्यांनी उद्या सकाळी नऊ वाजता ‘मातोश्री’वर (Matoshri) जाऊन हनुमान चालीसा वाचणार. शिवसैनिकात दम आहे की हनुमान चालिसाच्या नावामागे दम आहे हे पाहावं लागेल.’ असा इशारा नवनीत राणा यांनी यावेळी दिला आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, ‘हनुमान जयंतीच्या दिवशी चालीसा वाचला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. पण ते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. महाराष्ट्रावर अनेक संकट आली. उद्धव ठाकरे (Uddhav Thaceray) मुख्यमंत्री झाल्यापासून संकट आलं आहे. त्यांचं विघ्न हटवण्यासाठी चालीसा वाचण्याची गरज आहे,’ असे राणा यावेळी म्हणाल्या आहेत.

तसेच खासदार नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. ‘त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले. त्यांनी उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा वाचायला सांगावा. हनुमान जयंतीच्या दिवशी उद्धव ठाकरे हनुमान मंदिरात गेले नाही.

वीजेचं संकट आहे, बेरोजगारी आहे, शेतकरी शेतमजुरांचा प्रश्न आहे. त्यावर भाष्य करत नाही. मुख्यमंत्री कार्यालयात दोन वर्षानंतर आले आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयात फाईलींचा ढीग आहे. मग मुख्यमंत्र्यांना किती काम असेल तरीही ते मंत्रालयात येत नाहीत.’ अशीही टीका राणांनी यावेळी केली आहे.

त्याचसोबत नवनीत राणा यांनी यावेळी ‘बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही. समाजासाठी विचार केला आहे. बाळासाहेबांची तिसरी पिढी मंत्रीपदावर जगत आहे. राजकीय पोळ्या भाजत आहे. मी मुंबईची मुलगी आहे. माझा जन्म इथलाच. इथेच वाढले. विदर्भाची सून आहे.

हनुमान माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे शिवसैनिक माझं काही करू शकत नाही. शिवसेनेची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक अशी विधाने करत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा भंग करण्याचं काम शिवसैनिक करत आहेत.’ असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.