अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांसाठी ख्रिसमस हा फार मोठा दिवस आहे.

ख्रिश्चन धर्माचे लोक हा उत्सव प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा करतात. ख्रिसमसचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी ख्रिसमस ट्री असणे महत्वाचे मानले जाते.

लोक ख्रिसमसच्या झाडाची सजावट करतात, त्याच्यावर विविध गोष्टी टांगल्या जातात. आज आम्ही तुम्हाला ख्रिसमस ट्री सजवण्याच्या काही आयडीयाज सांगत आहोत.

लाईट्स ख्रिसमसच्या दिवशी संध्याकाळी घरात रंगीबेरंगी प्रकाशासाठी, ख्रिसमसच्या झाडाच्या सजावटीमध्ये रंगीबेरंगी लाईट्सचा वापर करा. ख्रिसमसच्या झाडावर दिवे लावण्यामुळे त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.

घंटी… ख्रिसमसच्या झाडाची सजावट सुंदर घंट्यांने करू शकतात. आपला ख्रिसमस ट्री सुंदर बनविण्यासाठी ख्रिसमसच्या झाडावर चमकदार, रंगीबेरंगी घंटा लावून आपण त्याची सजावट सुंदर बनवू शकता.

रिबन्स – आपण ख्रिसमस ट्रीच्या फांद्यांवर रंगीबेरंगी रिबन्स लपेटून झाडाची सजावट करू शकता. रिबन्सबरोबरच लहान चमकदार बॉल्सही सजावटीसाठी उपयुक्त ठरू शकतात. यासोबत काही स्टार्सदेखील वापरून तुम्ही तुमचा ख्रिसमस ट्री सजवू शकता.

कापूस – जर आपल्याला ख्रिसमसच्या झाडावर बर्फ दाखवायचा असेल, तर आपण कॉटन म्हणजे कापसाचा वापर करू शकता. झाडाच्या प्रत्येक फांदीवर आपण कलाकुसर करून कापूस सजवून ठेवा. यासह आपण त्यावर एक लहान टॉय देखील ठेवू शकता, जेणेकरून त्याचे सौंदर्य आणखी वाढेल.