अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- केवळ पोलिस हा शब्द उच्चारला तरी अनेकांची बोबडी वळते. त्यामुळे पोलिसांना त्रास देणे तर खूप दूरची गोष्ट आहे. मात्र दारू पिल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. याची प्रचिती श्रीगोंदा तालुक्यातील एकास आली आहे.

पोलिसांच्या आपत्कालीन नंबरवर कॉल करून काही इसम मारहाण करत असल्याची खोटी माहिती दिल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात योगेश मधुकर बोरुडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, दि.२९ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बोरुडे याने पोलिसांच्या आपत्कालीन नंबरवर कॉल करून त्याला काही इसम मारहाण करत असल्याचे कळविले .

ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सदर ठिकाणावर जावून शहानिशा करत विचारणा केली असता त्याने मी दारुच्या नशेत हा कॉल केला आहे,

मला मारहाण झालेली नाही असे सांगितल्याने पोलिसांना खोटी माहीती दिल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखालीपोलिस कों.दादासाहेब टाके

याच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात योगेश बोरुडे याच्या विरोधात खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.