HDFC Bank FD rate : HDFC ही देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. जर तुमचे या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण HDFC बँकेने पुन्हा एकदा एफडी दरात वाढ केली आहे. 

याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के व्याज मिळणार आहे. सामान्य लोकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना जास्त दर मिळत आहे. हे नवीन दर नुकतेच लागू झालेले आहेत.

आता हे आहेत HDFC बँकेचे नवे दर

7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के

15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के

30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के

46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.50 टक्के

61 दिवस ते 89 महिने: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

90 दिवस ते 6 महिने: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

6 महिने 1 दिवस ते 9 महिने: सामान्य लोकांसाठी – 5.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.75 टक्के

9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.00 टक्के

1 वर्ष ते 15 महिने: सामान्य लोकांसाठी – 6.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.60 टक्के

15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.40 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.90 टक्के

18 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के

2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के

3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के

5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के.