HDFC FD Scheme : HDFC बँकेच्या (HDFC Bank) गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लवकरच या बँकेची एक विशेष एफडी स्कीम (FD Scheme) बंद होणार आहे.

या बँकेने सॅफायर डिपॉझिट (Sapphire Deposit) या नावाने एफडी (FD) स्कीम चालू केली होती. ती आता बंद केली जाणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना (HDFC investors) 7.50 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

HDFC सॅफायर डिपॉझिट

मासिक उत्पन्नाच्या योजनांव्यतिरिक्त, HDFC चे सॅफायर डिपॉझिट (HDFC FD) त्रैमासिक, सहामाही, वार्षिक आणि संचयी पर्याय देखील ऑफर करते. मासिक उत्पन्न योजनेसाठी व्याज दर 7.25 टक्के आहे आणि किमान ठेव 40,000 रुपये आहे.

तिमाही पर्यायासाठी व्याज दर 7.30 टक्के आहे (HDFC Sapphire Deposit) आणि किमान ठेव रक्कम 20,000 रुपये आहे. सहामाही पर्यायासाठी व्याज दर 7.35 टक्के आहे आणि किमान ठेव रक्कम 20,000 रुपये आहे.

वार्षिक उत्पन्न योजनेसाठी व्याज दर 7.50 टक्के आहे आणि किमान ठेव रक्कम 20,000 रुपये आहे. संचयी पर्यायांतर्गत, HDFC 7.50 टक्के व्याज दर देत आहे आणि किमान ठेव रक्कम 20,000 रुपये आहे.

नियमित ठेवीवर परतावा

नियमित ठेवींवर, HDFC सध्या मासिक उत्पन्न योजनेंतर्गत 6.15 टक्के ते 6.85 टक्के, तिमाही पर्यायांतर्गत 6.20 टक्के ते 6.90 टक्के, सहामाही पर्यायांतर्गत 6.25 टक्के ते 6.95 टक्के, 6.65 टक्के ते 700 टक्के आहे.

वार्षिक उत्पन्न योजनेअंतर्गत आणि 12 ते 120 महिन्यांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींच्या संचयी पर्यायांतर्गत 6.35 टक्के ते 7.05 टक्के व्याजदर देत आहे. हे व्याजदर 30 सप्टेंबर 2022 पासून लागू आहेत.