अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  रेल्वे रुळावर एका ५६ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. रामदास निवृत्ती साबळे असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत साबळे हे नगर तालुक्यातील वाटेफळ येथील रहिवाशी असून नगर शहरातील एका महाविद्यालयात ते नोकरीस होते. साबळे हे कुटुंबासह वाटेफळ येथे वास्तव्यास आहेत.

गुरूवारी सकाळी कामावर जात असल्याचे सांगून ते नगरमध्ये आले होते. मात्र, सकाळी अकराच्या दरम्यान त्यांनी नगर कल्याण रोडवरील रेल्वे पुलाच्या उजव्या बाजुला आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर साबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. साबळे यांनी नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे समजू शकले नाही.