अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 AhmednagarLive24 : लग्न करून दोन लाख रूपये घेतले. ते परत मागितले असता मानसिक व शारीरीक झळ करण्यात आला. त्याला कंटाळून एका व्यक्तीने जुनी महानगरपालिका जवळील अग्निशमकच्या समोरील बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

गोवर्धन रामचंद्र जेटला (वय 50 रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड, अहमदनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पाच जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहण गोवर्धन जेटला (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये दिपाली राजू आडेप, सारीका विनोद भिमनाथ, दिपालीची बहिण राजमनी बोडखे, दिपालीचा भाऊ राजेश जंगम, दिपालीची बहिण सपना जंगम (सर्व रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी रोहण यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांच्या घराजवळ राहणारी सारीका भिमनाथ हिने लग्न स्थळ पाहण्यासाठी गोवर्धन जेटला यांच्याकडून 20 हजार रूपये घेतले होते.

सारीका हिने गोवर्धन यांच्यासाठी दिपाली राजु आडेप हिचे स्थळ आणले होते. या स्थळाला फिर्यादी रोहण व त्यांची बहिण अपुर्वा यांचा विरोध होता.

विरोध असतानाही वडिल गोवर्धन यांनी 20 एप्रिल, 2022 रोजी आळंदी देवाची (जि. पुणे) येथे लग्न केले. त्यादिवशी गोवर्धन हे दिपाली हिच्या घरी शिवाजीनगर येथे राहिले.

दुसर्‍या दिवशी 21 एपिल रोजी दुपारी ते घरी आले तेव्हा फिर्यादी रोहण यांना त्यांनी सांगितले की, दिपाली व सारीका यांनी मला दोन लाख रूपये मागितले आहे.

त्यांच्या दबाबावरून मी त्यांना शहर सहकारी बँकेच्या नवी पेठ शाखेतून दोन लाख काढून दिले. तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले,‘तुम्ही ते पैसे बहिण अपूर्ण हिचे लग्नाकरीता तिचे अकाऊंटवर टाकणार होते, तसे तुम्ही आम्हाला नोटरी करुन दिली आहे’.

त्यानंतर गोवर्धन दिपालीकडे पैसे मागण्यासाठी गेले असताना तिचा भाऊ राजेश जंगम व सपना जंगम यांनी त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर वडिलांनी दिपाली व सारीका याचेकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली परंतु त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली व पैसे परत दिले नाहीत.

त्यामुळे गोवर्धन यांना त्यांच्या छळाला कंटाळुन जुनी महानगरपालिका जवळील अग्निशमकचे समोरील बिल्डींगवरून उडी मारली आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये आत्महत्या करण्याचे कारणाचा व्हिडीओ शुट केलेला आहे व चिठ्या ही लिहुन ठेवलेल्या आहेत.