file photo

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  आपण रस्त्याने जात असताना असताना जर कोणी लिफ्ट मागितली तर संबंधित व्यक्तीस माणुसकीच्या भावनेने लिफ्ट देतो. परंतु काल एका कार चालकास अशीच म माणुसकीच्या भावनेतून केलेली मदत चांगलीच महागात पडली.

रस्त्यावर उभा राहून ती वाहनचालकांना लिफ्ट मागायची निर्जनस्थळ येताच वाहन थांबायला सांगायचे आणि मग थेट चालकाकडे पैशांची मागणी करायची, पैसे देण्यास नकार दिला तर आरडाओरड करून गुन्हा दाखल करायची धमकी द्यायची.

आणि वाहन चालका जवळ असतील तेवढे पैसे घेऊन पळ काढायचा आशा प्रकरणात सराईत असलेली एक महिला पुन्हा सक्रिय झाली असुन काल दुपारच्या सुमारास नगर जामखेड महामार्गावर चांदणी चौक ते टाकळी काझी दरम्यान एका वाहनचालकास असाच अनुभव येऊन मनस्ताप सहन करावा लागला .

याबाबत समजलेली माहिती अशी कि काल दुपारच्या सुमारास नगरहुन जामखेड कडे जात असलेल्या वाहन चालक चांदणी चौकात आला असता चौकात उभे असलेल्या दोन कालेज युवक आणि एक महिलेस एस टी बस बंद असल्याने त्यांना मदत करण्याच्या भावनेतुन वाहन चालकांने त्यांना गाडीत घेतले .

कॉलेजचे विद्यार्थी सारोळ्यात व महिला टाकळीस उतरणार असल्याचे सांगितले . त्या प्रमाणे कालेज चे ते दोन युवक सारोळ्याला उतरले व महिलेने टाकळी मध्ये टाकळीच्या माथ्यावर गाडी थांबवायला सांगितली . आपल्या पर्स मधुन पाचशे रुपये काढून तुमचे गाडीचे भाडे घ्या म्हणुन हुज्जत घालु लागली .

वाहन चालकाने पैसे घेण्यास नकार देत मी कुणाचे ही पैसे घेत नाही . बस बंद असल्याने मी आपणास येथे सोडले . परंतु महिला काही ऐकेना उलट कायद्याची भाषा करू लागली .

मी तहसील कार्यालयात नोकरीस असून आमच्या मॅडमना बोलावून तुमच्यावर कारवाई करते अशी धमकी देऊन तुमच्या कडे किती पैसे आहेत ते द्या अशी मागणी करत त्याचाकडील रोख रक्कम घेऊन तेथुन पसार झाली . अनपेक्षीत झाल्या प्रकाराने वाहन चालक ही मुकाट्याने पश्चाताप करत मार्गस्थ झाला .