file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- अवैध मार्गाने तस्करी करून तसेच चोरून पळवलेले चंदन कर्जत शहरातील एका लाकडाच्या वखारीत लपवून ठेवले .

मात्र याबाबतची माहिती मिळाल्याने पोलीसांनी काल रात्री छापा टाकून ९० हजार रूपये किंमतीचे २२ किलो चंदनाच्या लाकडाचा साठा जप्त केला आहे.

याप्रकरणी शेख मोईनुउदीन (रा. आंबेडकर गेटच्या समोर, कर्जत शहर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या अधिक

माहितीनुसार शहरातील एका लाकडाच्या वखारीत चंदनाच्या लाकडाचा अवैध साठा केल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळाली.

त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला असता संशयित शेखच्या घरात पहिल्या मजल्यावर चंदनाच्या लपवलेला लाकडाचा साठा पोलीसांनी जप्त केला.

यात एकुण ९० हजार रुपये किमतीची सुमारे अंदाजे २२ किलो वजनाचे चंदन आढळून आले. या नंतर शेख मोहिनुद्दीन याच्यावर पुढील कारवाईसाठी वनविभाग कर्जत यांच्याकडे मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले.