Health care tips : मधुमेह (Diabetes) हा बराच काळ टिकणाऱ्या आजारांपैकी एक आजार (Disease) मानला जातो. डायबेटिस हा पूर्णतः बरा होत नसला तरी त्याला आपण काही प्रमाणात नियंत्रणात (Control) ठेवू शकतो.

आज जगभरात मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केवळ गोडच नाहीतर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी काही पदार्थही टाळणे खूप गरजेचे असते.

बटाट्यापासून अंतर  ठेवा

बटाट्याचे (Potato) सेवन मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यात भरपूर स्टार्च (Starch) आढळतो, याचा अर्थ बटाट्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) असतात. याशिवाय बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.

भाजलेल्या बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 111 आहे, तर उकडलेल्या बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 82 आहे, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाला खूप नुकसान होते.

कॉर्न खाऊ नका  

कॉर्नचा (Corn) ग्लायसेमिक इंडेक्स 52 आहे, परंतु ते फायबर युक्त अन्नामध्ये गणले जात नाही, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकते. तरीही, जर तुम्हाला ते खायचे असेल तर ते उच्च फायबरयुक्त अन्न मिसळून खा.

मटार खाणे टाळा

मटारमध्ये (Peas) भरपूर कार्बोहायड्रेट आढळतात, त्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 51 आहे. मधुमेहामध्ये वाटाणा खाणे टाळा किंवा मर्यादित प्रमाणात खा.

भाज्यांचा रस पिऊ नका

हिरव्या भाज्यांचा रस (Juice of green vegetables) आरोग्यासाठी खूप फायदेशीर असला तरी या पेयामध्ये फायबरची कमतरता असते. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा चांगला पर्याय नाही. 

फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. भाज्यांचा रस पिण्याऐवजी त्यांचा आहारात समावेश केला तर बरे होईल.