Health Care Tips : दुधामध्ये कॅल्शियम (Calcium), जीवनसत्व डी (Vitamin-D) आणि पोटॅशियम असल्यामुळे ते आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे स्त्रोत मानले जाते. परंतु, गरम की थंड दूध (Milk) प्यावे असा प्रश्न अनेकांना पडतो.

काही जणांना गरम दूध (Hot milk) प्यायला आवडते तर काहींना थंड (Cold Milk). तसे पहिले तर दोन्ही प्रकारच्या दुधाचे फायदे आणि तोटे असतात. निरोगी शरीरासाठी दररोज 1 ग्लास दूध पिणे गरजेचे आहे.

गरम दुधाचे फायदे

कोमट दूध आणि मध एकत्र प्यायल्याने अँटीबॅक्टेरियलचे (Antibacterial) काम होते. दुधात मध मिसळून प्यायल्याने सर्दी-खोकला आराम मिळतो. गरम दूध लवकर पचते. यामध्ये लॅक्टियम (Lactium) नावाचे प्रोटीन असते जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

थंडीच्या दिवसात गरम दूध पिऊन तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या वाढवू शकता. हे शरीराला आर्द्रतेपासून वाचवते. यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते जे झोपायला मदत करते. त्यामुळे जर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल तर कोमट दूध पिऊन या समस्येपासून सुटका मिळू शकते.

थंड दुधाचे फायदे

थंड दूध प्यायल्याने ऍसिडिटी (Acidity) दूर होते कारण त्यात जास्त कॅल्शियम आढळते जे शरीरात जास्त ऍसिड तयार होऊ देत नाही. याचे दररोज सेवन केल्याने त्वचा अतिशय चमकदार आणि स्वच्छ होते.

थंड दूध आणि गरम दूध पिल्याने त्वचेवर परिणाम  

दूध थंड असो वा गरम, ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा नेहमी स्वच्छ आणि टोन्ड राहते.