कोरोनाची रुग्णसंख्या दररोज ७०० वरून १४०० वर गेली आहे. सध्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १०० झाली आहे. हीच गती कायम राहिली तर सरकारला नाइलाजाने निर्बंध लावावे लागतील.  

तिसरी लाट येणार आहे व ती ओमायक्रॉनची असणार आहे, असा दावाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. शाळा सुरू झाल्या असल्या तरी नवीन आदेशानुसार शाळा बंद करणे वा शाळा सुरू ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यातील शाळा सुरूच राहतील.असे ते म्हणाले.

ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या पाहता देशातील अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. यातज महाराष्ट्रात देखील निर्बंध लागू करण्यात आले आहे.

तसेच बाधितांची ही वाढ अशीच कायम राहिली तर यापूर्वी प्रतिदिन ८०० मे. टन ऑक्सिजन लागल्यास लॉकडाऊन लावण्यात येत होता. यात घट करून ती प्रतिदिन ५०० मे. टन करण्याचा विचार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान उत्सवकाळात अधिक गर्दी होऊ नये यासाठी हे निर्बंध लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युरोप, अमेरिका आदी देशांत संसर्गाचा दर दुप्पट होत आहे.

हॉटेल, चित्रपटगृह व रेस्टॉरंट ५० टक्केच्या मर्यादेत उपस्थिती गरजेची आहे. खुल्या जागेत पन्नास टक्के, तर बंदिस्त सभागृहात पंचवीस टक्के उपस्थिती ठेवून कार्यक्रम करण्याचे आदेश दिले.

तसेच प्रत्येकाने नियमाचे पालन करावे अशा सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येकाने काळजी घेतल्यास सर्व रुग्णांना मदत होणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.