अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- सामाजिक उपक्रम राबविताना आरोग्य विषयक कार्यक्रमाना प्राधान्य देणे गरजेचे असून रमेश सानप यांनी जय भगवान महासंघाच्या वतीने आज केलेला रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

या उपक्रमा पाठोपाठ जय भगवान महासंघाच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन आ.संग्राम जगताप यांनी दिले. जय भगवान महासंघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात आ.जगताप बोलत होते.

अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक,अध्यक्ष बाळासाहेब सानप होते. सानप यांची ही संघटना सामाजिक कार्य करणारी असून गोरगरीब जनतेला रुग्णवाहिकेचा फायदा होईल .कारण ही रुग्णवाहिका ना नफा ना तोटा या तत्वावर चालवणार आहेत.

आज आरोग्य सुविधा गरजेचे असून कोरोणाच्या प्रादृर्भावाने नगरकर त्रस्त होते त्या दरम्यान रुग्णवाहिकां उपलब्ध करुन दिल्याने गरजूना थोडासा का होईना दिलासा देता आला याचे समाधान आहे .

आपल्या कामाच्या पुढचा टप्पा म्हणून श्री ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारा दवाखाना साकारण्यासाठी जागा निश्चित करावी ती मिळवून देऊ असे आश्वासनही आमदार संग्राम जगताप यांनी दिले. जय भगवान महासंघाच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण आ. जगताप यांच्या हस्ते करण्यात आला .

याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले ,मनपा सभागृह नेते अशोक बर्डे ,नगरसेवक सुनील त्रंबके, नगरसेवक सचिन जाधव ,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमित गायकवाड ,माजी नगरसेवक अशोक दहीफळे, वंजारी समाज मंगलगेट ट्रस्टचे अध्यक्ष ॲड .बाळासाहेब खांडरे, एसटी कामगार नेते सुरेश क्षिरसागर ,

नाभिक समाज महिला जिल्हाध्यक्ष वनिता बिडवे, ओबीसी व्ही जे एन टी चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुनील भिंगारे ,ओबीसी व्ही जे एन टी चे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, आरपीआय राज्य सचिव सुनील क्षेत्रे ,काँग्रेस जिल्हा सरचिटणीस उबेद शेख ,तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री .सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते.

जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी जय भगवान महासंघाच्या कार्याची माहिती दिली जय भगवान महासंघ ही संघटना सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करत असून सामाजिक बांधिलकी अशी आमची नाळ जोडली गेली आहे.

राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रेरणेने जय भगवान महासंघ काम करत आहे जय भगवान महासंघास हॉस्पिटलसाठी जागा मिळाल्यास एक वर्षात हॉस्पिटल बांधण्याची जबाबदारी आम्ही घेऊ असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सानप यांनी करताना रुग्णवाहिकेचा लोकार्पनाचा आजचा कार्यक्रम करतानाच नगर शहरात ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारे रुग्णालय व्हावे यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली व आ.जगताप यांना निवेदनाची प्रत दिली.यावेळी ते म्हणाले, यावेळी ॲड. बाळासाहेब खांडरे म्हणाले की,

जय भगवान महासंघाने जो उपक्रम राबवला तो खरोखर चांगला असून असे लोकोपयोगी उपक्रम राबवले जावेत हा उपक्रम समाज उपयोगी असून हॉस्पिटलचा संकल्प ही सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. काँग्रेसचे उबेद शेख यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून समाजसेवेसाठी काही मदत लागल्यास आम्ही मदत करू .

उपमहापौर गणेश भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना जय भगवान महासंघाने केलेल्या कार्याची पावती म्हणून हॉस्पिटल साठी जागा उपलब्ध करून देऊ असा शब्द दिला .सभागृहनेते अशोक बडे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद देऊन आभार मानले व हॉस्पिटलच्या जागेसाठी जनरल बोर्डात ठराव मांडू असे सांगितले .

नगरसेवक सुनील त्रिंबके व नगरसेवक सचिन जाधव यांनी जय भगवान महासंघाच्या पाठीशी उभे असून रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या . यावेळी मान्यवरांचा तुलसी रोप देऊन सत्कार करण्यात आला.त्यात विशेषत: दिलीप वाघ यांनी वडाळा ता.

नेवासे येथील धनश्री हॉटेल मध्ये सापडलेले पाच तोळे सोन्याचे दागिने व पंचवीस हजार रुपये रोख इमानदारीने परत केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड ,उपाध्यक्ष अनिल इवळे ,सावता माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे ,ट्रांसपोर्ट असोसिएशनचे सचिव फिरोज खान,

प्रकाश सैंदर ,संजय आव्हाड ,राजू पडोळे आदी उपस्थित होते. शशिकांत सोनवणे, प्रमोद भिंगारे ,कैलास गरजे, विकी वायभासे ,राहुल सांगळे ,

संतोष ढाकणे ,वैभव ढाकणे ,नंदू कापसे ,नंदू साळवे ,शरद मुर्तडक ,महेश मुर्तडक , ॲड .योगेश भाकरे, संजय सानप ,गणेश बांगर, राजू शिंदे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.