Health Tips : आयुर्वेदातील अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती म्हणून कडुलिंब याकडे पहिले जाते.

आरोग्याशी संबंधित अनेक लहान-मोठ्या समस्या कडुलिंबा पासून दूर होतात.

चला तर जाणून घेऊया कडुलिंबाचे फायदे आणि वेगवेगळ्या समस्यांमध्ये कडुलिंबाचा वापर कसा करायचा.

शरीरात कुठेही खाज येत असेल तर कडुलिंबाची पेस्ट लावल्याने फायदा होतो.

कडुलिंबाची पाने बारीक करून डोक्याला लावल्यास त्याचे अ‍ॅटीफंगल गुणधर्म लगेचच प्रभाव दाखवतात.

कोंडा झाल्यास एका पातेल्यात पाणी घालून कडुलिंबाची पाने उकळा आणि पाणी हिरवे झाल्यावर गॅस बंद करा. आता कडुलिंबाचे पाणी थंड होण्यासाठी ठेवून द्या. शॅम्पू लावल्यानंतर या पाण्याने केस धुवा.

कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेलाही चमक येईल.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाची २-३ पाने खाणे चांगले मानले जाते.

कडुलिंबाची पावडर दररोज टाळूवर लावल्याने केस अकाली पांढरे होण्यास बंद होतात.

हिरड्या किंवा दातांमध्ये दुखत असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरते.