file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- या आजाराच्या सुरुवातीला जेव्हा डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्हच्या पेशी किरकोळ रूपात क्षतिग्रस्त होतात तेव्हा डोळ्यांसमोर छोटे छोटे डाग दिसू लागतात.

लोक सुरुवातीला ही लक्षणे गांभीर्याने घेत नाहीत व हळूहळू त्यांना कायमची दृष्टी गमवावी लागते. ग्लुकोमा डोळ्यांचा एक असा आजार आहे ज्यावर वेळीच उपचार न केल्यास दृष्टी कायमची जाऊ शकते. यासाठी खाली दिलेली लक्षणे दिसताच त्वरित नेत्ररोगतज्ज्ञांचा सह्ठा घ्यावा.

» लक्षणे : – कमी दिसू लागल्याशिवाय बहुतेकांना ग्लूकोमा ची लक्षणे कळू शकत नसतात. या आजाराच्या सुरुवातीला जेव्हा डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्हच्या पेशी किरकोळ रूपात क्षतिग्रस्त होतात तेव्हा डोळ्यांसमोर छोटे छोटे डाग दिसू लागतात. लोक सुरुवातीला ही लक्षणे गांभीर्याने घेत नाहीत व हळूहळू त्यांना कायमची दृष्टी गमवावी लागते.

फक्त अँक्यूट अँगल-क्लोअर ग्लूकोमाची लक्षणे आधीच ओळखता येतात, कारण हा आजार हळूहळू डोळ्यांवर आपली पकड घेतो. तशी ही लक्षणे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी आढळून येतात. डोळ्यातील दृष्टिपटल संकुचित होणे, डोळ्यांमध्ये तीव्र वेदना होणे, डोळ्यांसमोर इंद्रधनुष्यासमान रंगीत प्रकाशाची वर्तुळे दिसणे, डोक्यात चक्कर येणे व मळमळणे इ.

० ग्लूकोमाचे प्रकार : –

» ओपेन अँगल ग्लूकोमा : – हा ग्लूकोमाचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. हा ट्रवपदार्थ मुख्यत्वे डोळ्यांच्या बाहुल्यांमधून जात डोळ्यांच्या इतर भागात वाहतो आणि द्रव नलिकांच्या माध्यमातून डोळ्यांच्या आतील भागात पोहोचू शकत नाही, जिथे हा फिल्ट केला जातो. यामुळे डोळ्यांवर या द्रवाचा दाब राहतो व त्यामुळे दृष्टी क्षीण होते.

» लो टेंशन वा नॉर्मल अँगल ग्लूकोमा : – यात डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्ह नष्ट होतात आणि साइड व्हिजन कमी होत जाते.

» अँगल क्लोजर ग्लुकोमा : – मध्ये डोळ्यांच्या द्रवपदार्थाचा दाव. अचानक खूप वाढतो. या अवस्थेत दाब कमी करण्यासाठी तत्काळ उपचार करण्याची गरज असते.

» चाइल्ड ग्लूकोमा : – या प्रकारचा ग्लुकोमा बहुधा नवजात शिशूंना बा किशोरवयीन मुलांना होतो. वेळीच उपचार न केल्यास मुले कायमची दृष्टिहीन होऊ शकतात.

» कन्झननाइटल ग्लूकोमा : – हा ही मुलांमध्ये आढळणाऱ्या ग्लूकोमा चा एक प्रकार आहे. ज्यामध्ये जन्मापासून मुलाच्या डोळ्यांत ग्लूकोमाची लक्षणे आढळून येतात.

» प्रायमरी ग्लूकोमा आणि सेकंडरी ग्लूकोमा : – ओपेन अँगल आणि अँगल क्लोजर ग्लुकोमा गांभीर्याचा आधारे प्रायमरी व सेकंडरी अशा दोन भागात विभागला जाऊ शकतो. प्रायमरी ग्लूकोमा सुरुवातीची अवस्था म्हणता येते, तर सेकंडरी ग्लूकोमात ग्लूकोमासोबत डोळ्यांच्या इतर समस्या उद्‌भवतात.

० टेस्ट : –

» व्हिज्युअल अँक्युटी टेस्ट : – हे सामान्य नेत्र परीक्षण असून, यामध्ये डोळ्यांच्या दृष्टीचे मापन केले जाते.

» प्यूपिल डायलेशन : – यामध्ये डोळ्यांमध्ये थोड्या वेळासाठी आय ड्रॉप टाकून नंतर मशीनने रेटिना व ऑप्टिक नर्व्हची विस्तृत तपासणी केली जाते.

» व्हिज्युअल फील्ड : – यात व्यक्तीच्या डोळ्यांचे साइड व्हिजन तपासले जाते. जर ते कमकुवत असेल, तर ती व्यक्ती ग्लूकोमाने पीडित असते.

» टोनोमेटरी टेस्ट : – यात डोळ्यांत असलेला द्रवपदार्थ एक्ेस ह्यूमस्च्या डोळ्यांवरील दाबाची तपासणी करतात.

० उपचार : – उपचार आजार सध्या कोणत्या अवस्थेत आहे यावर ठरत असतो. प्राथमिक अवस्थेत फक्त औषधाद्वारे हि, उपचार करता येतात. जर डोळ्यांचा आकार छोटा असेल, तर लेसर पद्धतीने ऑपरेशन करून पाण्याच्या नळीचा मार्ग मोठा केला जातो. आजार गंभीर असल्यास सर्जरीद्वारे उपचार केले जातात.

ऑपरेशननंतर १५ दिवसांनंतर रोगी सामान्य व पूर्णपणे बरा होतो. पण, ऑपरेशननंतरही डॉक्टरांकडून नियमित तपासणी व डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असते.

० अशी बाळगा सावधगिरी :-

» जर कुटुंबात आईवडिलांना ग्लूकोमा असेल, तर मुलांनाही हा आजार होण्याची शक्‍यता असते.

» चष्मा वापरत असाल, तर आपल्या डोळ्यांची नियमित चेकिंग करून घ्या.

» मधुमेहींनी ही ग्लूकोमा चा धोका असतो.

» ब्लडप्रेशर खूप जादा वा खूप कमी असला, तरी ग्लूकोमा होऊ शकतो. त्यामुळे जर ब्लडप्रेशर खूप जास्त वा कमी राहात असेल, तर नियमितपणे डोळे तपासून घ्यावे.

» हदयरोग ही या आजाराचे कारण आहे.

» वयाची चाळिशी उलटली असेल, तर वर्षातून एकदा डोळे तपासून घ्यावेत.

» जर लहान मुलांचे डोळे सामान्यपेक्षा मोठे दिसत असतील बा मूल सूर्यप्रकाश सहन करू शकत नसेल वा त्याच्या डोळ्यांतून पाणी येत असेल, तर त्याचे डोळे तपासून घ्यायला हवेत.