वादळी पावसानंतर पुन्हा चढला पारा ! दिवसभर उष्णता रात्री पावसाने शरीरावर परिणाम , ‘असे’ सांभाळा आरोग्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मार्च, एप्रिल मध्ये ऊन्हाचा जोर कायम असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भर दुपारच्या कडक उन्हाच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडण्यास टाळत असुन प्रत्येक जण आपापल्या डोक्यावर पडणाऱ्या उन्हापासून वाचण्यासाठी टावेल टोपी, रुमाल आदीचा वापर करत आहे. तरीही उन्हाचा तडाखा नागरिकांना बसतच आहे.

उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे सध्या तरी दुपारच्या वेळेत रस्ते सामसूम झालेले दिसत आहे.एप्रिल महिन्याच्या सुरूवाती पासूनच तापमानाची मोठी नोंद झाली असून दुपारच्या वेळेत बाजारातील रस्ते ओस पडू लागले आहेत. ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव करणारे अंगावरील कपडे उष्णतेच्या चटक्याने तापत असून त्या कपड्याचेही चटके नागरिकांच्या जिवाची लाही लाही करत आहेत.

मागील काही दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात मोठी बाढ होत आहे. गावकऱ्यांसह शेतकरी आणि मजूरवर्गाला शेतात काम करताना उष्णतेमुळे मोठा त्रास होत असल्याची स्थिती आहे. उन्हाळ्यात वाढत्या तापमानाने, उन्हात फिरल्याने किंवा उन्हामुळे आरोग्यावर विपरित परिणाम देखील होत आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य आग ओकू लागल्याने जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे, अनेक शारीरिक व्याधी उलटी, उष्माघात अंगदुखी, चक्कर येणे ,मळमळ होणे,पोट दुखी अनेक व्याधीने आज प्रत्येक व्यक्ती ग्रासलेला दिसत आहे. त्यामुळे आजार डोके वर काढत आहे. तापमान काही दिवसांपासून ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !
सकाळपासूनच ऊन जाणवायला सुरुवात होत आहे यामुळे घराबाहेर पडताना ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, कामगारांनी,शेतमजुरांनी आजारी पडणार नाहीत यासाठी टोपी, रुमाल, गम्जा डोक्यावर घेऊनच बाहेर पडावे. थंडपेय ‘शरबत, सतत शुध्द पाणी घ्यावे असा सल्ला दिला जात आहे. सध्या दवाखान्यात, ओपीडीत येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

तसेच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी सतत पाणी प्यावे, उन्हात जाणे टाळावे, सुती आणि सैल कपड्यांचा वापर करावा, काकडी, कलिंगड, खरबूज, मोसंबी या फळांचा खाण्यासाठी वापर करावा, पाणी भरपूर प्यावे. अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन तज्ज्ञ करत आहेत.