आरोग्य

ब्लड कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला ! संशोधनात आ. थोरातांच्या जावयाची मोठी भूमिका

Published by
Ahmednagarlive24 Office

ब्लड कॅन्सर हा गंभीर आजारांपैकी एक आजार. यावर उपचार पद्धती शोधण्यासाठी विविध संशोधने सुरु आहे. अनेक ठिकाणी विविध प्रयोग केले जात आहेत. आता आयआयटी मुंबईने ब्लड कॅन्सरवरच्या उपचारासाठी जनुकीय उपचार पद्धती विकसित केली आहे.

भारतात प्रथमच ही उपचार पद्धती विकसित करण्यात यश आलं आहे. आता या उपचार पद्धतीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने देखील मान्यता दिली आहे. या पद्धतीच्या वापराने आता देशात जेनेटिक्सवर आधारित ब्लड कॅन्सरचे उपचार अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होतील.

आ. थोरातांचे जावई डॉ. हसमुख जैन यांचे योगदान

IIT मुंबईचे डॉ. राहुल पुरवार यांनी शोधलेल्या CAR T Cell उपचार पद्धतीला NexCAR19 असे नाव सध्या दिले गेले आहे. या संशोधनात टाटा हॉस्पिटलचे डॉ. हसमुख जैन यांचे मोठे योगदान लाभले आहे. डॉ. हसमुख जैन हे काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे जावई आहेत. थोरात यांनीच ‘एक्स’वर या उपचार पद्धतीला मान्यता मिळाल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेच्या तुलनेत केवळ १० टक्के खर्चात उपचार

ब्लड कॅन्सरच्या रुग्णांच्या शेवटच्या टप्प्यात कोणताही उपचार प्रभावी ठरत नाही. अशावेळी रुग्णाच्या रक्तातील पांढऱ्या पेशी काढून त्यावर उपचार केले जातात. या उपचाराचा प्राथमिक टप्पा अमेरिकेत उपलब्ध होता; पण त्यासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च येतो. पण आयआयटी मुंबई आणि टाटा हॉस्पिटलने १० वर्षे संशोधन करून जे उपचार पद्धती विकसित केली आहे

त्याची अमेरिकेशी तुलना करता फक्त १० टक्के खर्चात हे उपचार भारतात आता होतील. टाटा हॉस्पिटलमध्ये या उपचाराची चाचणी झाली असून यात ७० टक्के रुग्णांवर सकारात्मक परिणाम झाल्याची महत्वपूर्ण माहिती देखील थोरातांनी दिली आहे.

Ahmednagarlive24 Office