आरोग्य

Adulteration In jaggery: गुळाच्या रंगावरून ओळखू शकता तुम्ही गुळातील भेसळ! वाचा कोणत्या रंगाचा गूळ असतो भेसळयुक्त?

Published by
Ajay Patil

Adulteration In jaggery:- अन्नपदार्थांमधील भेसळ हा एक ज्वलंत प्रश्न असून फार मोठी गंभीर समस्या आहे. कारण विविध खाद्यपदार्थ किंवा अन्नपदार्थांमधील भेसळ याचा संबंध थेट मानवी आरोग्याशी येत असल्यामुळे याची गंभीरता खूप आहे. भेसळीचा विचार केला तर प्रामुख्याने दुधात केली जाणारी भेसळ ही खूप मोठ्या प्रमाणावर असून  दुग्धजन्य पदार्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भेसळ केले जात असल्याचे आपल्या वाचनात नक्कीच आले असेल.

दुधाव्यतिरिक्त इतर पदार्थांमध्ये देखील भेसळ मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये गुळ हा देखील बऱ्याच घरांमध्ये नेहमी वापर केला जाणारा अन्नपदार्थ असल्यामुळे गुळातील भेसळ ही देखील एक महत्त्वाची समस्या आहे. आपण बऱ्याचदा बाजारांमधून गुळ खरेदी करतो. परंतु आपण खरेदी करत असलेला गूळ नेमका शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखणे खूप कठीण असते.

परंतु तरी देखील तुम्ही गुळाच्या रंगावरून किंवा इतर गोष्टींवरून गुळातील भेसळ आहे की नाही यासंबंधीचा अंदाज परिपूर्णपणे लावू शकतात. त्यामुळे या लेखात आपण गुळातील भेसळ कशी केली जाते व ती कशी ओळखावी? त्याबद्दलची माहिती घेऊ.

 गुळामध्ये प्रामुख्याने कोणत्या पदार्थाची भेसळ करतात?

जर शरीराच्या दृष्टिकोनातून गुळाचा विचार केला तर शरीराला डिटॉक्स ठेवण्याकरिता गुळाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच गुळामध्ये पोटॅशियम तसेच झिंक, कॅल्शियम व लोह, विटामिन बी व प्रोटीन यासारखे अनेक पोषक तत्वे असल्यामुळे शरीराला खूप फायदेशीर असतो. तसेच हिवाळ्यामध्ये गुळाची मागणी जास्त असते.

महत्त्वाच्या असलेल्या या गुळाचा विचार केला तर बनावट किंवा भेसळीयुक्त गूळ तयार केला असेल तर त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट व सोडियम बायकार्बोनेट इत्यादी घटकांचा वापर केलेला असतो. म्हणजेच हे घटक गूळ तयार करताना त्यामध्ये मिसळले जातात. परंतु बऱ्याचदा आपल्याला पौष्टिक किंवा शुद्ध गुळ आणि भेसळयुक्त गुळ यामधील फरक समजत नाही. परंतु हे दोन्ही घटक जर मिसळलेले असतील तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असते.

 रंगावरून ओळखा गुळातील भेसळ

जेव्हा तुम्ही दुकानातून किंवा बाजारांमधून गुळाची खरेदी कराल तेव्हा त्याच्या रंगावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही खरेदी करत असलेला गुळ जर लाल तसेच गडद तपकिरी रंगाचा असेल तरच तो खरेदी करावा. परंतु या व्यतिरिक्त जर गुळाचा रंग पिवळा किंवा हलका सोनेरी असेल तर तो गुळ भेसळयुक्त किंवा बनावट असण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे लाल किंवा तपकिरी रंगाचा गूळ हा चांगला मानला जातो. कारण जेव्हा उसाचा रस उकळून गुळाची निर्मिती केली जाते तेव्हा गुळाचा रस उकळला जातो व तेव्हा त्याला लाल व तपकिरी रंग येत असतो. या दोन्ही रंगाव्यतिरिक्त जर दुसऱ्या रंगाचा गुळ असेल तर तो भेसळयुक्त असतो हे लक्षात ठेवावे.

Ajay Patil