Adulteration In Salt:- खाद्यपदार्थांमधील भेसळ ही एक गंभीर समस्या असून ही समस्या फार मोठ्या प्रमाणावर सध्या पसरली आहे. दुध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल यासारख्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यात येते. अशा प्रकारची भेसळ ही प्रामुख्याने अनेक रसायनांचा वापर करून केली जाते व त्यामुळे साहजिकच असे खाद्यपदार्थ जर आपल्या शरीरामध्ये गेले तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होण्याची दाट शक्यता असते.
भेसळ करणारे कशा पद्धतीने भेसळ करतील व कुठल्या खाद्यपदार्थात करू शकतील हे देखील आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. आता यामध्ये जर आपण मिठाचा विचार केला तर मिठाशिवाय कुठल्याच अन्नपदार्थाला चव प्राप्त होत नाही. स्वयंपाक घरामध्ये सगळ्यात जास्त मिठाचा वापर केला जातो.
परंतु तुम्हाला माहिती आहे का की मिठामध्ये देखील भेसळ केली जाऊ शकते. अशा पद्धतीने जर भेसळयुक्त मीठ जर आपण खाल्ले तर त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या लिव्हर तसेच पचन संस्था, मेंदू व किडनीवर होण्याचा देखील संभव असतो. त्यामुळे आपल्या घरात आपण वापरत असलेले मीठ हे भेसळ युक्त आहे की चांगले आहे?
हे तुम्हाला समजणे खूप गरजेचे आहे. परंतु हे तुम्ही कसे ओळखाल हा देखील एक मोठा प्रश्न आहे? याबाबत जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांनी काही छोट्या परंतु महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या असून त्या आधारे तुम्ही मिठातील भेसळ ओळखू शकता.
अशा पद्धतीने ओळखा मिठातील भेसळ
बटाट्याचा वापर करून तुम्ही मिठातील भेसळ ओळखू शकता. याकरिता तुम्ही बटाट्याचे दोन तुकडे करावे व एका बटाट्याच्या तुकड्यावर मीठ किंवा सैंधव मीठ ठेवावे. दुसऱ्या तुकड्यावर कोणत्याही ब्रँडचे मीठ ठेवावे. जर काही वेळानंतर बटाट्याचा रंगांमध्ये काही बदल झाला तर समजावे की ते मीठ भेसळयुक्त आहे.
कारण मीठ जर शुद्ध असेल तर बटाट्याचा रंगात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. याबाबत बाबा रामदेव म्हणतात की, अनेक व्यापारी सामान्य मिठामध्ये रंग मिसळतात व त्याला सेंधव मीठ म्हणून बाजारामध्ये विक्री करतात. असे मीठ जर पाण्यामध्ये टाकले तर लगेचच मिठातून ते रंग निघत असतात व असे रंग जर मिठातून निघत असेल तर ते मीठ भेसळयुक्त आहे असे समजावे.
बनावट मीठ खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते?
तुम्ही जर आहारामध्ये भेसळयुक्त मीठ घेत असाल तर अशा प्रकारच्या मिठामध्ये अनेक रसायनांची भेसळ केलेली असते व त्यामुळे शरीराला नुकसान पोहोचू शकते.
असे मीठ खाल्ल्यामुळे मुतखडा तसेच संधिवात, लिव्हरशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ही सोपी ट्रिक वापरून तुमच्या घरात वापरत असलेले मीठ शुद्ध आहे की बनावट हे सहजपणे ओळखू शकतात.