आरोग्य

कडाक्याच्या थंडीत सर्दी- खोकल्याने त्रस्त आहात व छातीत कफ जमा झाला आहे? ‘हे’ सोपे उपाय करा, 10 मिनिटात कफ होईल गायब

Published by
Ajay Patil

Home Remedies On cold And Cough:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा हा पाच अंशाच्या आसपास आल्याने एकंदरीत प्रचंड प्रमाणात थंडीचा कडाका जाणवत आहे व यामुळे आरोग्याच्या काही समस्या देखील उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

थंडीच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने सर्दी तसेच खोकला व छातीत कफ होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसायला लागतात. या तिन्ही समस्यांमुळे दैनंदिन कामकाजावर देखील खूप विपरीत असा परिणाम दिसून येतो व अस्वस्थ असं वाटायला लागते

त्यामुळे सर्दी किंवा खोकला तसेच छातीत कफ जमा झाल्यामुळे ती प्रचंड प्रमाणात त्रस्त होते व यापासून मुक्तता मिळावी म्हणून अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करायला लागते. परंतु यावर इतर गोष्टींचा हवा तितका अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

परंतु जर बघितले तर यावर काही घरगुती असे उपाय खूप फायद्याचे ठरू शकतात. सर्दी खोकला किंवा छातीत कफ जमा झाला तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी जर काही घरगुती उपाय केले तर यापासून मुक्तता मिळते व छाती जमा झालेला कफ देखील दूर होण्यास मदत होते.

हे घरगुती उपाय करा आणि सर्दी-खोकला आणि छातीत जमा झालेल्या कफपासून मुक्तता मिळवा

1- लिंबू आणि काळी मिरीचा वापर- लिंबूमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर असते व त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका लिंबू पार पाडतो. तसेच काळीमिरी कफ बाहेर काढण्यासाठी प्रभावी ठरू शकते. या दोघांचे सेवन जर केले तर छातीत जमा झालेला कफ निघण्यास मदत तर होते व घसा देखील साफ होतो.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हा उपाय करण्याकरिता एक कप गरम पाणी घ्यावे व त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर काळी मिरी टाकावी व चांगले हलवून घ्यावे. त्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करावे. यामुळे घसा साफ होण्यास मदत होते व सर्दी पासून मुक्तता मिळते.

2- हळदीच्या दुधाचा वापर- हळद आरोग्यासाठी खूप चांगली असते. हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटिव्हायरल गुणधर्म असल्याने ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप समृद्ध असते. छातीमध्ये जर कफ जमा झाला असेल तर हळदीचे दूध खूप फायद्याचे ठरते. हळदीचे दूध प्यायल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत होतेच

परंतु शरीराला चांगला आराम मिळतो. हा उपाय करण्यासाठी एक ग्लास कोमट दूध घ्यावे आणि त्यात अर्धा चमचा हळद टाकावी. हे दूध हळद टाकल्यानंतर चांगले मिसळून रात्री झोपण्यापूर्वी ते पिऊन घ्यावे व यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होतो. त्यामुळे छातीत जमा झालेला कफ दूर होण्यास मदत होते व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

3- तुळस व लवंगाचा चहा- तुळस आणि लवंग या दोघांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने खोकला आणि घशात खवखव होणे इत्यादी समस्यांवर खूप प्रभावी ठरते. तुम्ही जर तुळस आणि लवंगची चहा पिली तर घशाची सूज कमी व्हायला मदत होते व इतर संसर्गापासून देखील शरीराचे रक्षण होते.

ही चहा जर तुम्हाला तयार करायची असेल तर याकरिता एक कप पाण्यामध्ये सात ते आठ तुळशीची पाने टाकावी व त्यामध्ये दोन लवंग टाकून चांगले उकळून घ्यावे व गाळून दिवसातून दोनदा प्यावे.

4- आले आणि काळे मिरीचा चहा- अद्रक हे दाहक विरोधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर समजले जाते. त्याचे हे गुण घशातील सूज आणि कफ कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच काळीमिरी ही अनेक प्रकारच्या संसर्गांपासून शरीराचे रक्षण करते. या दोन्ही पदार्थांपासून बनवलेल्या चहा जर पिला तर खोकला तसेच घसा दुखी पासून तात्काळ आराम मिळतो.

हा चहा जर तुम्हाला तयार करायचा असेल तर याकरिता आल्याचा रस काढावा व त्यामध्ये एक चमचा मध घालावे. त्यानंतर काळी मिरी पावडर टाकून ते पाणी चांगले उकळून घ्यावे व नंतर गाळून ते प्यावे. हा उपाय दिवसातून दोनदा जर केला तर सर्दी खोकल्यापासून आराम तर मिळतोच परंतु छातीत जमा झालेला कफ देखील दूर होण्यास मदत होते.

( टीप- वरील माहिती ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. त्यामुळे कुठलीही आरोग्य विषयक समस्या असल्यास किंवा आहारात बदल करायचा असल्यास आरोग्य तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Ajay Patil