आरोग्य

Brain Tumour : सावधान.. डोकेदुखी आणि मळमळ देखील असू शकतात ब्रेन ट्यूमरची लक्षणे, चुकूनही करू नका ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष

Published by
Ahmednagarlive24 Office

Brain Tumour : चुकूनही ब्रेन ट्यूमरच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कारण हीच सुरूवातीची लक्षणे ही आपल्याला खूप सामान्य वाटत असतात. हा मेंदूशी निगडित आजार असतो आणि याची जाणीव कुणालाच नसते. त्यामुळं तब्येतीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

जर तुम्हालाही ब्रेन ट्यूमरशी निगडित काही लक्षणे दिसून आली तर लगेच त्यावर उपचार घ्या. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. ब्रेन ट्यूमर म्हणजे काय? ब्रेन ट्यूमरची लक्षणे कोणती? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

ब्रेन ट्यूमर हा एक गंभीर आजार असून जर तो लवकरात लवकर शोधून उपचार केले नाही तर ते खूप प्राणघातक ठरू शकते. जाणून घेऊयात उपचारांबद्दल तज्ञांचे मत काय ?

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

ही मेंदूतील एक प्रकारची असामान्य ऊतींची अनियंत्रित वाढ असून घ्या की मेंदूतील सर्व गाठी घातक किंवा कर्करोगजन्य नसतात. हे लक्षात घ्या की कॅन्सरग्रस्त ब्रेन ट्यूमर हे कॅन्सर नसणाऱ्या ब्रेन ट्यूमरपेक्षा वेगाने वाढत असतात. तसेच ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांमुळे डोक्याशिवाय इतरही लक्षणे दिसतात. ब्रेन ट्यूमर हा एकतर मेंदूच्या ऊतींमध्ये किंवा त्याच्या आसपास होतो किंवा ते शरीराच्या इतर भागांमधून मेंदूमध्ये पसरतो, यालाच मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर असेही म्हणतात.

लक्षणे

ब्रेन ट्यूमरची लक्षणे ही इतर रोगांसारखीच असतात. समजा, लोक ब्रेन ट्यूमरमुळे होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करून वेदनाशामक औषधे घेतात. परंतु ही लक्षणे ट्यूमरमुळे दिसून येत नसून ट्यूमरमुळे मेंदूवर पडत असणाऱ्या दाबामुळे ती दिसून येतात. ट्यूमर असणाऱ्या लोकांना डोळ्यांशी निगडित समस्या असण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मळमळ किंवा उलट्या हे एक लक्षण आहे.

याबाबत डॉक्टरांच्या मते, मेंदू बहुतेक शारीरिक कामे नियंत्रित करत असतो आणि ट्यूमरच्या आसपासच्या भागाच्या कम्प्रेशनमुळे लक्षणे निर्माण करत असतो. याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी आणि उलट्या होणे तसेच दृष्टी कमी होणे किंवा अस्पष्ट होणे, ऐकायला कमी येणे, अशक्तपणा, बोलण्यात अडचण आणि गिळण्यात अडचण इ समावेश असू शकतो.

याकडे दुर्लक्ष करू नये

1. सतत डोके दुखणे

जर तुमचे खूप जास्त डोके दुखत असेल तर डोकेदुखीकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जरी डोकेदुखी खूप सामान्य समस्या असली तरी जर ती अनेक काळापासून असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवावे.

2.डोळ्याची समस्या निर्माण होणे

जर तुम्हाला अस्पष्ट दृष्टी, दुहेरी दृष्टी किंवा अचानक दृष्टी कमी होणे यासारख्या डोळ्यांच्या समस्या असतील तर ब्रेन ट्यूमर असण्याची शक्यता आहे.

3. मळमळ आणि उलट्या होणे

सतत मळमळ, उलट्या किंवा चक्कर येणे हे एक मेंदूतील गाठीचे लक्षण असण्याची शक्यता आहे.

इतर लक्षणे

ब्रेन ट्यूमरमुळे त्या व्यक्तीच्या वागण्यातही अनेक बदल होत असतात. डॉक्टरांच्या मतानुसार ब्रेन ट्यूमरची लक्षणे आणि चिन्हे त्याच्या आकारावर आणि स्थानावर अवलंबून असतात. जसे की

  • डोके जड होणे
  • हात किंवा पाय सुन्न होणे
  • भाषण समस्या
  • सतत खूप दमल्यासारखे वाटणे
  • दैनंदिन व्यवहारात गोंधळ
  • स्मृती समस्या
  • मळमळ किंवा उलट्या
  • डोळ्यांच्या समस्या निर्माण होणे
  • तीव्र भूक लागणे किंवा वजन वाढणे
  • व्यक्तिमत्व किंवा वर्तनात बदल होणे
  • ऐकण्याच्या समस्या निर्माण होणे
  • सतत चक्कर येत राहणे
Ahmednagarlive24 Office