Health News : स्मार्टफोन, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटस्मुळे सध्या सर्वांचा आणि विशेषतः तरुणांचा स्क्रिन टाईम वाढला आहे. याचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत.
लेखक जेम्स नेस्टर यांनी ‘ब्रेथ : द न्यू सायन्स ऑफ अ लॉस्ट आर्ट’ या पुस्तकात असा दावा केला आहे की, स्क्रीन टाइम वाढल्याने आपल्या श्वासोच्छवासाची पद्धतदेखील बदलली आहे.
नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील मानसोपचारशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन पोर्जेस यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते स्क्रिन टाईम वाढणे ही सध्या फार मोठी समस्या बनली आहे.
या संदर्भात मायक्रोकॉफ्ट या कंपनीच्या माजी कार्यकारी अधिकारी लिंडा स्टोन यांनीदेखील एक प्रयोग केला आहे. त्यांनी २०० लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांचे ई-मेल तपासत असताना त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती (हार्टबीटस्) आणि श्वासोच्छवासाचे निरीक्षण केले.
त्यातून असे आढळून आले की ई-मेल चेक करताना सुमारे ८० टक्के लोक आपला श्वास रोखून धरतात. किंवा त्यांच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीत बदल होतो. या समस्येला त्यांनी ई-मेल अॅप्निया असे नाव दिले.
नंतर, जेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपला श्वासोच्छवासाचा पॅटर्न केवळ मेल चेक करतानाच नाही तर स्क्रीनवर काहीही करताना देखील बदलतो, तेव्हा त्याने त्याला स्क्रीन अॅप्निया असे नाव दिले.