Health Tips : ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी होऊ शकतो धोकादायक त्वचारोग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips : भारतात बऱ्याच लोकांना त्वचेशी संबंधित समस्या आहेत, जर त्याकडे दुर्लक्ष झाले तर समस्या वाढते. आपल्या शरीरात विशिष्ट जीवनसत्त्वाची कमतरता नाही ना, हे वेळीच जाणले पाहिजे. त्वचेच्या आजारामागे अनेक कारणे असतात,

कधी हवामान कारणीभूत असते, तर कधी रक्तातील घाण, पण कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की जीवनसत्त्व ‘ड’च्या कमतरतेमुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्वचेसाठी हे पोषक तत्त्व आपल्या त्वचेसाठी इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया.

सूर्यप्रकाशातून मिळते जीवनसत्त्व ‘ड’

जीवनसत्त्व ‘ड’ला ‘सनशाईन व्हिटॅमिन ‘ असे म्हणतात, कारण ते सूर्यप्रकाशापासून मिळते. स्वीडन आणि नॉर्वेसारख्या ध्रुवीय देशांमध्ये, जिथे वर्षाचे जवळजवळ ६ महिने सूर्यप्रकाश पडत नाही, तिथल्या लोकांमध्ये या पोषक तत्त्वांची कमतरता असते. मात्र, हे पोषक तत्त्व अनेक खाद्यपदार्थ खाऊन मिळवता येते.

त्वचेसाठी महत्त्वाचे

जर तुमच्या शरीरात जीवनसत्त्व ‘ड’ची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक त्वचेच्या आजारांना सामोरे जावे लागते, ज्यात एटोपिक डर्माटायटिस आणि सोरायसिसचा समावेश आहे. या पोषक तत्त्वाच्या कमतरतेमुळे, त्वचेतील पेशींच्या चयापचयाशी संबंधित व्यवहार मंदावतात, ज्यामुळे त्वचारोग होऊ शकतात. जीवनसत्त्व ‘ड’च्या कमतरतेमुळे त्वचेचे इतरही अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते, जसे की तुमच्या त्वचेचा रंग उजळणे, चेहऱ्याची चमक कमी होणे, त्वचेचा कोरडेपणा, त्वचेचा थर दिसणे आणि शरीराला खाज येणे. म्हणूनच ‘सनशाईन व्हिटॅमिन ‘ कधीही कमी पडू देऊ नका

जीवनसत्त्व ‘ड’ असलेले अन्न

जरी भारतात सूर्यप्रकाश जवळजवळ वर्षभर मिळतो, परंतु शहरांमध्ये अशी काही घरे आहेत जिथे खोलीत सूर्यप्रकाश योग्य प्रकारे पोहोचत नाही, अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अन्नाद्वारे जीवनसत्त्व ‘ड’ मिळवायचे असेल तर पुढील नमूद केलेल्या गोष्टी खाऊ शकता. यात प्रामुख्याने अंडे, फॅटी फिश, संत्रे, सोयाबीन, मशरूम, दही, ऑयस्टर, लॉबस्टर, गायीचे दूध, रिकोटा चीज यासारख्या वस्तू खाल्ल्यास जीवनसत्त्व ‘ड’ची ‘ कमतरता भरून निघू शकेल.