Dengue Diet Tips : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये अनेक रोग तोंड वर काढत असतात. तसेच पावसाळ्यात डेंग्यूचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
डेंग्यू हा आजार एडिस डासाच्या चाव्याव्दारे होतो. डेंग्यू झाल्यानंतर शरीरात तीव्र ताप, डोकेदुखी आणि अनेक अवयव दुखू लागतात तसेच शरीरातील प्लेटलेट्स देखील कमी होतात. या आजाराची लक्षणे पहिल्यांदा सौम्य असतात. मात्र हळूहळू या रोगाची लक्षणे तीव्र होत जातात. मात्र या आजरामध्ये अनेक पदार्थ खाणे टाळले पाहिजे अन्यथा धोका आधिक वाढू शकतो.
मसालेदार अन्न
डेंग्यू झाल्यानंतर किंवा त्याची लक्षणे दिसल्यानंतर अनेक पदार्थ काणे टाळले पाहिजे. जर या दिवसांमध्ये तुम्ही मसालेदार पदार्थ खाल्यानंतर पोटात अॅसिड जमा होऊन अल्सरची समस्या वाढू शकते. त्यामुळे अशा दिवसांमध्ये मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
कॉफी
डेंग्यूच्या दिवसांमध्ये कॉफी पिणे नेहमी टाळले पाहिजे तसेच कॅफिनशी संबंधित गोष्टींचे सेवन करणे टाळले पाहिजे. जर तुम्ही अशा प्रकारच्या कॉफीचे सेवन केले तर हृदयाचे ठोके, थकवा आणि स्नायूंच्या समस्या वाढू शकतात.
मांसाहार टाळा
डेंग्यूच्या दिवसांमध्ये अनेकजण मांसाहार करतात. मात्र मांसाहार करणे घटक ठरू शकते. कारण मांसाहारामध्ये अनेक मसाले असतात. तसेच मांसाहारामुळे पचनाची समस्या वाढते. त्यामुळे मांसाहार करणे नेहमी टाळा.
डेंग्यूमध्ये या गोष्टी खा
नारळ पाणी
जर तुम्हालाही डेंग्यू झाला असेल तर तुम्ही नारळाचे पाणी प्या. कारण नारळाचे पाणी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. नारळाच्या पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि आवश्यक पोषक घटक असतात.
पपईचे पान
तसेच डेंग्यूमध्ये तुम्हाला आरोग्य तज्ज्ञांकडून पपई खाण्याचा सल्ला दिला जातो किंवा त्याच्या पानाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या पानामध्ये पपेन आणि किमोपापेन सारखी एन्झाइम्स आढळतात. असे केल्याने तुम्हाला पचनास कोणतीही समस्या निर्माण होत नाही. तसेच प्लेटलेट देखील वाढतात.
किवी
किवी खाल्ल्याने पोटॅशियमसह व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई अधिक प्रमाणात शरीरास मिळतात. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यासोबतच ते उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबावरही नियंत्रण ठेवते. तसेच रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.