Health News : आपल्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. एक दिवस जरी पिण्यासाठी पाणी नसले तरी काय होऊ शकते याची कल्पना न केलेली बरी. पाण्याशिवाय आपले जीवन अशक्य आहे. आरोग्य तज्ज्ञ असेही सांगतात की माणूस जितके जास्त पाणी पितो तितके त्याच्या आरोग्यासाठी चांगले असते.
तज्ज्ञांनी सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी पिले पाहिजे. शरीरात पाण्याची कमतरता राहिल्यास पेशींपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही. पण पाणी पिताना तुमच्याकडून जर काही चुका झाल्या तर मात्र याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने काही गंभीर आजार होऊ शकतात. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास घशाचा कर्करोग होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
1. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिऊ नका
आजकाल प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतात. पण प्लास्टिकच्या बाटल्या तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. एका अभ्यासात असे समोर आले आहे की,
प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा पाण्यात मिसळतो आणि त्यामुळे रक्तात मायक्रोप्लास्टिक पॉल्यूशन पसरते. त्यामुळे पाणी घशातील अवयवांना म्हणजेच पिण्याच्या मार्गाला नुकसान पोहोचवते आणि कर्करोगाचा धोका असतो.
2. शरीराला किती पाणी लागते
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास डिहायड्रेशनची समस्या टाळता येते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्रौढांनी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.
3. अशा पद्धतीने कधीही पिऊ नका
पाणी पाणी पिताना बहुतेक लोक काही चुका करतात. जसे की फ्रिंजमधून बाटली बाहेर काढून लगेच पाणी पिणे. तसेच, काही लोक एकाच वेळी खूप पाणी पितात. एवढेच नाही तर जेवण करताना किंवा नंतर लगेच पाणी पिऊ नये. जास्त मिनरल्स असलेले पाणी पिणे टाळा. या सर्व सवयीमुळे तुम्हाला आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाणी प्या.