आरोग्य

H9N2 : लहान मुलांचे जीवनच आलेय धोक्यात ! चीनमध्ये गंभीर स्थिती निर्माण करणारा नवा व्हायरस आहे तरी कोणता ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोरोना महामारीने संपूर्ण जग पिळवटून निघाले. ही महामारी चीनमधूनच सर्व जगात पसरली असा मतप्रवाह आहे. परंतु आता सध्या एक वेगळीच प्रकारची बिमारी, आजार सध्या चीन मध्ये धुमाकूळ घालतोय.

सुरवातीला सौम्य वाटणारा हा आजार आता मोठा धोक्याची घंटा वाटायला लागली आहे. याच कारण असं की तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पब या व्हायरसने संक्रमित 7 हजारांवरून अधिक लहान मुले दररोज हॉस्पिटलमध्ये आणले जात आहेत. त्यांच्या श्वसनादी मार्गावर हा व्हायरस अटॅक करत आहे.

न्यूमोनियासारखा आजार

न्यूमोनियासारखा हा आजार असून तो पसरत आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनकडून माहिती मागवली होती. यावेळी चीनने असं म्हटलं आहे की,मुलांमध्ये न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ ही ‘असामान्य’ किंवा ‘नवीन आजार’ नाहीये. सध्या फ्लूसारखे आजार डोके वर काढत आहेत.

H9N2 व्हायरस

हा साधारण H9N2 व्हायरस असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत अशी माहिती दिली की, उत्तर चीनमधील मुलांमध्ये H9N2 प्रकरणांचा प्रसार आणि श्वसन रोगांच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

चीनमध्ये पसरणाऱ्या या H9N2 विषाणूपासून भारताला धोका खूपच कमी आहे. H9N2 विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो, परंतु यात मृत्यू दर कमी आहे.

H9N2 व्हायरस नेमका काय आहे ? कोठून आला ? महामारी पसरवू शकतो का?
बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू हा A टाइप चा इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. H9N2 हा या या विषाणूचा उपप्रकार असल्याचे सांगितले जाते. पक्ष्यांसह माणसांनाही याचा संसर्ग होतो.

अमेरिकेत 1966 मध्ये H9N2 विषाणू पहिल्यांदा आढळला होता. त्यानंतर हा विषाणू वन्य टर्की पक्ष्यांत आढळून आला. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) नुसार, H9N2 विषाणू जगभरातील जंगली पक्ष्यांमध्ये आढळतो. WHO च्या अंदाजानुसार H9N2 हा विषाणू पोल्ट्री फार्ममध्ये जर पसरला तर माणसांत देखील पसरू शकेल.

भारतात या आजाराचा किती धोका ?

शक्यतो हा विषाणू माणसांना संक्रमित करू शकत नाही. परंतु कधी कधी असेही होते की, याची लक्षणे अतिशय सौम्य असतात आणि त्यामुळे अनेक वेळा त्याचा रिपोर्टही येत नाही. हा विषाणू पोल्ट्री फार्ममध्ये सर्वाधिक पसरतो.

2008 ते 2011 दरम्यान, बांगलादेशातील पोल्ट्री फार्ममध्ये तर 2017 मध्ये बुर्किना फासोमध्ये या व्हायरसने खळबळ उडवून दिली होती. सध्या चीनमध्ये पसरणाऱ्या या आजाराचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही असे सांगिले आहे.

तर काही तज्ञ असेही म्हणत आहेत की, चीनमध्ये मुलांमध्ये पसरत असलेला हा आजार मायकोप्लाझ्मा बॅक्टेरियाचा संसर्ग असेल त्यामुळे हा आजर पसरत आहे.

कोविडच्या काळात चीनमध्ये सर्वात कडक लॉकडाऊन असल्याने तेथील लोकांची इम्युनिटी कमी झाली आहे अन त्यामुळे असे होत असेल असे म्हटले जात आहे. असे असले तरी शक्यतो हा आजार भारतात पसरण्याचा धोका कमीच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24