Health Tips : दारूचा एक ग्लास देऊ शकतो मृत्यूला आमंत्रण! वाढतो ‘या’ आजराचा धोका, त्वरित द्या लक्ष

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips : देशात अनेक तरुण आणि ज्येष्ठ मंडळी दारूचे सेवन करत असतात. तसेच दारूचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दारूचे सेवन शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अनेकदा दारूचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

काही लोकांना दररोज दारूचे सेवन करण्याची सवय असते तर काही जण अधून मधून शौक म्हणून दारूचे सेवन करत असतात. मात्र एका संशोधनात अशी माहिती उघड झाली आहे की, जे लोक दररोज दारूच्या एका ग्लासचे सेवन करतात त्यांचा रक्तदाब झपाट्याने वाढतो.

सध्या उच्च रक्तदाबाची समस्या ज्येष्ठांमध्येच नाही तर तरुणांमध्ये देखील वाढत आहे. त्यामुळे जर तुम्हीही दररोज दारूच्या एका ग्लासचे सेवन करत असाल तर तुमच्यासाठी ते धोक्याचे ठरू शकते.

अमेरिकन असोसिएशन जर्नल हायपरटेन्शनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. यामधील अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक नियमित दारूचे सेवन करतात त्यांचा रक्तदाब अधूनमधून दारूचे सेवन करणाऱ्यांपेक्षा जास्त असतो आणि त्यांचा रक्तदाब वाढण्याचा धोकाही अधिक असतो.

दारूचे सेवन शरीरासाठी खूप धोकादायक आहे हे अनेक संशोधनातून समोर आले आहे. तसेच उच्च रक्तदाबाची समस्या तुमच्या शरीराचे नुकसान करू शकते. जर रक्तदाब नियंत्रणात नसेल तर अपंगत्व देखील येऊ शकते. तसेच हृदयविकाराचा झटका किंवा अशा व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

अल्कोहोलचे सिस्टोलिक रक्तदाबावर होणारे नकारात्मक परिणाम दररोज अत्यंत कमी प्रमाणात मद्यपान करणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांमध्येही दिसून आले. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढत असतो.

तरुण पुरुषांमध्ये सिस्टोलिक रक्तदाबाचा धोका सर्वाधिक असतो. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धोका अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे दररोज दारूचे सेवन तुम्ही मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.

सामान्य रक्तदाब

एक व्यक्तीचा सामान्य सिस्टोलिक रीडिंग साधारणपणे १२० मिमी Hg किंवा त्याहून कमी असते. परंतु काही वेळा कमकुवत रक्तवाहिन्या रक्त पातळ झाल्यामुळे रक्तदाबाचा धोका वाढत असतो.

तसेच एका व्यक्तीचा सामान्य डायस्टोलिक रीडिंग 80 mm Hg पेक्षा कमी असते. मात्र वाढत्या वयानुसार आणि रक्तवाहिन्या लवचिक झाल्याने तसेच कडक उन्हामुळे देखील ते कमी होत असते.

जर तुम्हीही दररोज दारूचे सेवन करत असाल तर आजच ते बंद करा, कारण जर तुमचा रक्तदाब सतत वाढत राहिला तर हृदयविकाराचा झटका, अपंगत्व , किडनीचा आजार किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.