आरोग्य

Health Tips: उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील फ्रीजमधील बर्फाचे थंडगार पाणी पिता का? तर सावधान नाहीतर तुम्हाला….

Published by
Ajay Patil

Health Tips:- सध्या प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत असून राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 43 डिग्री सेल्सिअसेच्या दरम्यान आहे. त्यामुळे प्रचंड उष्णतेने अंगाची होणारी लाही लाही त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्रस्त झाल्याचे चित्र आहे. या उखाड्यापासून आराम मिळावा याकरिता बरेचजण या कालावधीत थंड पेय पिण्याला प्राधान्य देतात आणि घरामध्ये असताना मोठ्या प्रमाणावर फ्रीजमधील थंडगार पाणी पितात.

यामध्ये बऱ्याच जणांना अतिप्रमाणामध्ये थंड असलेले पाणी प्यायची सवय असते. तुम्हाला माहिती आहे का अशा प्रकारे अतिप्रमाणात थंड झालेले पाणी जर प्यायले तर शरीराला याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये बर्फाचे थंड पाणी न पिणे आरोग्यासाठी हितकारक ठरते. या अनुषंगाने आपण या लेखात उन्हाळ्याच्या हंगामात बर्फाचे थंड पाणी प्यायला मुळे काय त्रास होऊ शकतो याबद्दलची माहिती घेऊ.

 या कारणांमुळे उन्हाळ्यात बर्फाचे थंड पाणी पिऊ नये

1- रक्तवाहिन्या संकुचित होणे अतीथंड पाणी पिल्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारचे पाणी पिले तर घशामधील रक्तप्रवाह कमी होतो व त्यामुळे घशाला एखादा संसर्ग झाला असेल तर तो बरा होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा पाण्यामुळे सुज येणे, क्रॅम्प येणे आणि बद्धकोष्ठता यासारखी देखील समस्या उद्भवू शकतात.

2- स्नायूंवर ताण येतो अशाप्रकारे थंड पाणी पिल्यामुळे घशातील स्नायूंवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांना गिळण्यास त्रास होतो आणि अस्वस्थता देखील जाणवते. याव्यतिरिक्त घसा खवखवणे, नाक बंद होणे आणि श्वसन संक्रमण देखील होण्याची शक्यता असते. म्हणजे थंड पाण्यामुळे हृदयाची गती कमी होऊ शकते व यामुळे होणाऱ्या परिणामाची माहिती देताना पोषण सल्लागार याशिका दुआ म्हणतात की, त्यामुळे हृदयाची गती कमी होते व हा परिणाम दहाव्या क्रानियल मज्जातंतूच्या सक्रियते मुळे होतो व यालाच व्हॅगस मज्जातंतू देखील म्हणतात. शरीराच्या स्वायत्त मज्जासंस्थेचा एक महत्त्वाचा घटक हृदय गती नियंत्रित करण्यासाठी जबाबदार आहे असे देखील त्यांनी सांगितले.

3- मणक्याचा त्रास थंड पाणी पिले तर मणक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात व त्याचा सरळ परिणाम मेंदूवर होण्याची शक्यता असते व डोकेदुखी होते. यामुळे सायनस आणि मायग्रेनचा त्रास असेल अशा लोकांचे समस्या आणखी वाढू शकते.

4- पचनक्रियेत अडथळा अत्यंत थंड पाणी पिल्यामुळे रक्तवाहिन्या अंकुचन पावतात व पचन क्रिया विस्कळीत होण्याची शक्यता वाढते. थंड पाण्यामुळे पोटदेखील अंकुचन पावते व जेवल्यानंतर पचनक्रिया गुंतागुंतीचे होते व पचनसंस्था थंड पाण्याच्या प्रभावाबाबत खूप संवेदनशील असते. कारण पचनाच्या वेळी पोषक द्रव्य शोषणाच्या नैसर्गिक प्रक्रियेत त्यामुळे अडथळा येऊ शकतो.

5- वजन नियंत्रणामध्ये समस्या शरीरामधील जे काही फॅट साठलेले असतात त्यांचा वापर करण्यामध्ये थंड पाणी अडथळा आणते व वजन कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये देखील समस्या निर्माण होते. याबाबत तज्ञ म्हणतात की जर जेवण केल्यानंतर लगेचच थंड पाणी प्यायले तर खाल्लेल्या पदार्थांमधील फॅट घट्ट होतात.त्यामुळे जेवण केल्यानंतर कमीतकमी अर्धा तास तरी थंड पाणी पिऊ नये.

6- दातांची समस्या थंड पाणी हे दात संवेदनशीलतेला देखील कारणीभूत ठरू शकते व यामुळे पाणी पिण्यात अडचणी निर्माण होतात व याबद्दल तज्ञ म्हणतात की जर तुम्ही खूप थंड पाणी पिले किंवा पदार्थांचे सेवन केले तर त्याचा मुलामा दातांना चढवून कमकुवत करू शकते व दातांमध्ये संवेदनशीलता यामुळे निर्माण होते.

7- घसा खवखवणे जास्त थंड पाणी पिल्यामुळे घशामध्ये खवखव होण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच काही जणांना आधीपासून घसा दुखणे किंवा सूज येण्याची समस्या असेल तर त्यात वाढ होऊ शकते. जेवणानंतर अशाप्रकारे बर्फाचे पाणी किंवा अति थंड पाणी पिले तर घशातील श्लेष्मा वाढू शकतो व यामुळे सर्दी, एलर्जी आणि फ्लू सारख्या समस्या वाढू शकतात.

Ajay Patil