Health Tips:- आजच्या जीवनशैलीत वाढता ताण, चुकीच्या सवयी आणि असंतुलित आहार यामुळे अनेक पुरुष लैंगिक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यात नपुंसकता ही समस्या अतिशय गंभीर असून ती केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करते.अनेक वेळा औषधांचा अवलंब केला जातो. पण काही नैसर्गिक उपाय आणि आयुर्वेदिक वनस्पतींच्या मदतीनेही ही समस्या दूर करता येते.
आयुर्वेदिक वनस्पती ठरतात फायद्याच्या
आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगितले आहे, ज्या प्रजननक्षमतेत वाढ करणाऱ्या आणि लैंगिक दुर्बलता दूर करणाऱ्या गुणांनी युक्त असतात. यामध्ये अश्वगंधा, गोक्षुरा, शतावरी आणि सफेद मुसळी यांसारख्या वनस्पतींचा समावेश होतो.
‘या’ वनस्पतींचे नियमित सेवन ठरेल फायद्याचे
टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांच्या लैंगिक क्षमतेसाठी महत्त्वाचा संप्रेरक आहे. या वनस्पतींमधील पोषक घटक नैसर्गिकरित्या याची पातळी वाढवतात व शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता वाढवण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती प्रभावी ठरतात.
त्यामुळे वंध्यत्वाची समस्या कमी होण्यास मदत होते.या वनस्पती नैसर्गिक तणाव कमी करणारे घटक असलेली असल्याने मानसिक शांतता मिळते आणि उर्जा वाढते. उत्तम रक्ताभिसरणामुळे लैंगिक दुर्बलता दूर होण्यास मदत होते. लैंगिक क्षमता नाही तर प्रतिकारशक्ती वाढवून एकूणच शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते.
या वनस्पतींचे सेवन कसे करावे?
अश्वगंधा चूर्ण – रात्री कोमट दुधासोबत एक चमचा घ्या.
गोक्षुरा पावडर – मध किंवा गुळासोबत घेतल्यास फायदेशीर ठरते.
शतावरी आणि सफेद मुसळी – यांचे मिश्रण करून काढा तयार करून दिवसातून दोन वेळा प्यायल्यास उत्तम परिणाम दिसतात.
कोणत्या सवयी महत्त्वाच्या?
कपालभाती, भस्त्रिका आणि उत्तानासन यांसारखी आसने उपयुक्त ठरतात. प्रथिने, झिंक आणि जीवनसत्त्वांनी युक्त आहार सेवन करा. अल्कोहोल आणि धूम्रपान टाळा हे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम करू शकतात. चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान ७-८ तासांची झोप आवश्यक आहे.