आरोग्य

Health Tips : नैसर्गिक उपायांनी हार्मोन्सला संतुलित कसं ठेवाल, जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- एक महिला तिच्या आयुष्यात अनेक बदलांना सामोरी जाते. या बदलांसाठी मुख्यत्वे जबाबदार असतात ते हार्मोन्स. हार्मोन्समध्ये आलेल्या असंतुलनाचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबचच आपले केस, त्वचा आणि दृष्टीबरही होतो.

मूडमध्ये बदल, प्रकाशाच्या बाबतीत संवेदनशीलता, तेलकट त्वचा आणि केस, काही खाण्याची इच्छा न होणे, झोप न येणे, चिंता, तणाव आणि चिडचिड यांसारखी लक्षणं हार्मोनल बदलांचा संकेत आहे. गर्भावस्था, मासिक पाळी आणि रजोनिवृत्तीदरम्यान हार्मोन्सचं संतुलन जास्त बिघडते, पण हे एका विशिष्ट वयापर्यंत सीमित राहिलेलं नाही.

आता तर व्यग्न दीनचर्या आणि तणावाची जीवनशैली यामुळे ही समस्या कमी वयातही महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसते. हार्मोन्सच्या या असंतुलनाला सामान्य करणं अवघड नाही. खास गोष्ट म्हणजे काही नैसर्गिक उपायांना आजमावून आपण हे काम करू शकतो. याचा फायदा असा की, यामुळे आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

 जवसाच्या बिया : – जवसाच्या बिया चांगल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. यामध्ये फायबर्स, ओमेगा-३ फॅटी अँसिड पुरेशा प्रमाणात असतात. जवसाच्या बिया रक्त शर्करेला सामान्य ठेवण्यास आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप सहायक ठरते. वेगवेगळ्या अध्ययनांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, ज्या महिलांनी नियमितपणे जवसाच्या बियांचं सेवन केलं त्यांच्या शरीरात प्रोजेस्टेरॅन आणि एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर संतुलित राहिला. जवसाच्या बियांची पावडर करून ती वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मिसळू शकता.

सावधगिरीने पेय पदार्थांचे सेवन : – दारू, कॅफिन आणि साखरयुक्त पेय पदार्थ आपल्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडवू शकतात. कारण यामुळे कॉर्टिसोल हार्मोन उत्पादन वाढते. ज्याचा परिणाम गर्भाशयाच्या कार्यप्रणालीवर होतो. जर तुम्हाला तहान लागली तर साधं पाणी किंवा नारळपाणी प्या. जर एनर्जी हवी असेल तर ग्रीन टी प्या. यामध्ये कॅफिनचं योग्य प्रमाण आणि अमिनो ऑसिड एल थिएनिन असते, जे मेंदूच्या कार्यप्रणालीला तंदुरुस्त ठेवतात.

 तणावाचे व्यवस्थापन : – तणावाचा परिणाम आपल्या आयुष्यावर चारही बाजूने होतो. अनेकदा आपण तणावामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. प्रक्रिया केलेल्या खाद्य पदार्थांचं सेवन करतो. झोपही पूर्ण होत नाही. तणावामुळे शरीरात कार्टिसोल नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो. ज्यामुळे थकवा जाणवतो. असं होण्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. हार्मोनल संतुलन बिघडतं. तणावाला दूर करण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करा. चालायला जा, योगासनं करा.

डेयरी उत्पादन काळजीपूर्वक निवडा : – डेयरी उत्पादनांमध्ये पोषक घटकांचा खजिना असतो, पण जर तुम्ही हार्मोन असंतुलनाला सामोरे जात असाल तर तुम्ही डेअरी उत्पादन म्हणजे दही, क्रिम यांचं सेवन करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करायला हवा. एका अध्ययनाद्वारे हे सिद्ध झाले की, डेअरी उत्पादनांच्या सेवनाने काही विशेष हार्मोन्सची पातळी कमी होते.

हर्ब्स परिणामकारक : – क जीवनसत्त्व, ब ५, इल्युथेरे आणि रोडिओला असे हर्ब्स आहेत, जे एनर्जी देतात. हे न्युरोट्रांसमीटर्सला सपोर्ट करतात आणि तणाव कमी करणाऱ्या हार्मोन्सची पातळी वाढते. हे शरीरात हार्मोनचं नैसर्गिक संतुलन टिकवून ठेवण्यास मदत करतात.

योग आणि व्यायाम सहाय्यक : – नियमितपणे योग आणि व्यायाम करण्याचे फायदे कोणीच नाकारू शकत नाही. यामुळे शरीरात रक्ताचा उत्तम संचार होतो. आनंदी ठेवणाऱ्या हार्मोन एंडोरफिनचा स्त्राव वाढतो, शरीराचं वजन सामान्य बनण्यास मदत होते आणि हृदयाचं आरोग्य चांगलं रहाते. व्यायाम आपल्यासाठी एक नैसर्गिक औषध समान आहे. यामुळे शरीरातील कार्टिसोल हार्मोनचं प्रमाण कमी होते आणि तणाव दूर करण्यासाठी मदत होते. आठवड्यातून कमीत कमी एकशेन्नास मिनिटांसाठी हलका अँरोबिक व्यायाम करणे आवश्यक आहे.

 पूर्ण झोप : – जेव्हा आपण झोपतो, तेव्हा मेंदू शरीराला डिटोक्सिफाय करते. म्हणून दररोज कमीत कमी आठ तास झोपा. यामुळे शरीरात कार्टिसोल, मेलाटोनिन, सोमाट्रोपिन यांसारखी हार्मोन्स संतुलित राहते. नेहमी अंधारात झोपा. निळा प्रकाश नसावा.

Ahmednagarlive24 Office