Health Tips : आजकाल अनेकांच्या जीवनशैलीमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. चुकीचा आहार आणि चुकीच्या सवयीमुळे कमी वयातच अनेक गंभीर आजार होत आहेत. चुकीच्या सवयींमुळे अनेकांना आरोग्याच्या खूप समस्या निर्माण होत आहेत.
रात्री झोपल्यानंतर अनेकांना अचानक जाग येते. तसेच एकदा नाही तर वारंवार अनेकदा असे घडत असते. त्यानंतर झोपण्याचा प्रयत्न केला तरीही झोप बराच वेळ झोप लागत नाही. जर तुम्हाला रात्री १ ते ४ वाजेदरम्यान जाग येत असेल तर तुम्हाला देखील गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
रात्री अचानक झोपेतून जाग येत असेल तर तुम्हाला फॅटी लिव्हर या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अशा आजारात यकृतामध्ये खूप चरबी जमा होते आणि यकृत योग्यरित्या काम करणे थांबवते.
झोपेचा यकृताशी काय संबंध?
जेव्हा तुम्ही रात्री गाढ झोपता आणि तुम्हाला अचानक जाग येत असेल तर तुम्हाला यकृतासंबंधी आजार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला देखील घ्या.
जेव्हा यकृत फॅटी किंवा मंद असते, तेव्हा शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी अधिक ऊर्जा लागते, जेव्हा असे होते तेव्हा मज्जासंस्था आपल्याला चालना देते आणि आपल्याला झोपायला लावते. दुसरीकडे, यकृत निरोगी असल्यास, या काळात आपली झोप कमी होत नाही.
फॅटी लिव्हरची समस्या का उद्भवते?
जेवणात मिरची-मसाल्यांचा जास्त समावेश केल्यास फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.
वाढलेले वजन हे फॅटी लिव्हरचे प्रमुख कारण आहे. यासाठी तुम्हाला दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे.
कधीकधी टाईप-2 मधुमेह असलेल्या व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या देखील असते.
ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांना फॅटी लिव्हर देखील असू शकतो.
फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी या गोष्टी खा
एवोकॅडो
तुम्हालाही फॅटी लिव्हरची समस्या असेल तर तुम्ही एवोकॅडो खा. हे खाल्ल्याने तुम्हाला यकृत डिटॉक्सिफाई करण्यास मदत करते. तसेच यकृताद्वारे स्रावित पाचक एन्झाईम्स वाढवते. यामुळे तुमची चरबी वितळण्यास मदत होईल.
लसूण
फॅटी लिव्हरची समस्या असलेल्या लोकांना अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच लसूण खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लसणातील अँटी-इंफ्लेमेटरीज यकृत निरोगी ठेवते.
बीन्स, चणे किंवा राजमा
बीन्स, हरभरा आणि राजमा यासारख्या गोष्टी खाल्ल्याने फॅटी लिव्हरची समस्या कमी होते. बीन्स, हरभरा आणि राजमामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे.
सूर्यफूल बिया
तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असेल तर तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता. सूर्य फुलाच्या बिया अँटिऑक्सिडंट म्हणून काम करत असतात. त्यामुळे सूर्य फुलाच्या बिया फॅटी लिव्हरसाठी फायदेशीर मानल्या जातात.