आरोग्य

Health Tips : तुम्हालाही सतत भूक लागतेय? यामागे असू शकतात ‘हे’ गंभीर आजार, त्वरित जाणून घ्या…

Published by
Ahmednagarlive24 Office

Health Tips : अनेकांना काम करत असताना, अभ्यास करत असताना किंवा चित्रपट बघत असताना खाण्याची सवय असते. परंतु जर तुम्हालाही रिकाम्या वेळेत खाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

कारण सवयीचा भाग म्हणून दिवसातून अनेकवेळा काही ना काही खाणं हे तणावाचं किंवा भीतीचं लक्षण असू शकतं. तुम्हालाही अशी सवय असेल तर ती आजच बंद करा. कारण यामुळे तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फटकाही बसू शकतो. कसे ते जाणून घ्या सविस्तरपणे.

प्रथिनांची कमतरता

एका संशोधनानुसार, प्रथिने भूकेच्या संप्रेरकांवर नियंत्रण ठेवताना समाधानाचे संप्रेरक सक्रिय ठेवत असतात. समजा तुम्हाला वारंवार भूक लागत असल्यास तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की दुग्धजन्य पदार्थ, मासे आणि सी फूड, डाळी, सोयाबीन, अंडी आणि मांस यांचा समावेश करा.

झोपेची कमतरता

वेगवेगळ्या संशोधनातून असे सिद्ध होत आहे की मेंदू आणि रोगप्रतिकारक प्रणाली सुरळीतपणे कार्य करण्यासाठी पुरेशी झोप खूप गरजेची आहे. तुम्हाला झोपेच्या कमतरतेमुळे हृदयरोगापासून कर्करोगापर्यंत सर्वच गोष्टींचा धोका जास्त वाढू शकतो. शरीरात घरेलिन हार्मोन वाढल्याने सतत भूक लागते. तर दुसरीकडे, पुरेशी झोप घेतली तर शरीरातील लेप्टिनची पातळी वाढते.

.. त्यावेळी पाणी पिऊ नका

पाण्यामुळे पचनसंस्था निरोगी राहत असली तरी जेवणापूर्वी थोडेसे पाणी प्यायले तर भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे आपण जास्त खात नाही. सतत भूक लागली तर आधी पुरेसे पाणी प्या. अशी फळे आणि भाज्या खा, ज्यात जास्त रस आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नसून भूक नियंत्रणात राहते.

फायबरचा अभाव

फायबरयुक्त पदार्थ तुम्हाला दीर्घकाळ समाधानी ठेवत असल्याने यामुळे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स वाढतात. शॉर्ट चेन फॅटी ऍसिडचे उत्पादन करण्यास मदत करते. अंबाडीच्या बिया, रताळे आणि संत्री इत्यादींचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करावा.

तणाव

ज्यावेळी आपण जास्त तणावाखाली असतो, तेव्हा शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोनची पातळी वाढत असते, ज्यामुळे भूक आणि लालसा वाढत जाते. काही काळ नियमित ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम फायद्याचे ठरेल.

Ahmednagarlive24 Office