Health Tips : तुम्हीही दररोज दही खाताय? तर चुकूनही करू नका ‘हे’ काम, नाहीतर वाढेल धोका


दही खाण्याचे फायदे खूप आहेत, परंतु तसे त्याचे तोटेदेखील आहेत. अनेकांना त्याबद्दल कसलीच माहिती नसते, त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे. या दिवसात दह्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. आयुर्वेदात दह्याचे खूप फायदे सांगण्यात आले आहेत. दह्यापासून बनवण्यात आलेले विविध पदार्थ खाण्यात एक वेगळीच मजा असते.

परंतु दही खाण्याच्या वेळेची, प्रमाणाची आणि संयोजनाची काळजी घ्यावी लागते. दरम्यान जसे दही खाण्याचे अनेक फायदे आहेत, तसेच दही खाण्याचे अनेक तोटे आहेत. याबाबत अनेकांना कसलीच कल्पना नसते त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जर तुम्हीही उन्हाळ्यात रोज दही खात असाल तर वेळीच सावध व्हा.

वाढते शरीरातील उष्णता

आपल्या सर्वांना माहिती आहे की दह्यात थंड करण्याचे गुणधर्म असतात. परंतु आयुर्वेदानुसार दह्याची चव आंबट असते तसेच त्याची प्रकृती उष्ण प्रकारची असते. दही हे पचनासाठी खूप जड असते. इतकेच नाही तर पित्त आणि कफ दोषात हे खूप जास्त असून वात दोषात कमी आहे. त्यामुळे दही खात असताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. समजा तुम्ही योग्य प्रकारे दह्याचे सेवन केल्यास तुम्हाला त्यापासून कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही. एवढेच नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरणार नाही.

असे करा सेवन

उन्हाळ्याच्या दिवसात रोज दही खाण्याऐवजी ताक खाण्याला प्राधान्य द्यावे. हे ताक तुम्ही काळे मीठ, काळी मिरी तसेच जिरे टाकून तुम्ही ते पिऊ शकता. जर दह्यामध्ये पाणी मिसळले गेले की ते दह्याच्या गरम स्वभावाचे संतुलन राखत असते. दह्यात पाणी घातले तर त्याची उष्णता कमी होते तसेच कूलिंग इफेक्ट मिळतो.

याशिवाय दही गरम केल्यानंतर ते खाऊ नका हेही महत्त्वाचे आहे. जर तुम्ही असे केले तर दह्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात. समजा जर तुम्ही लठ्ठपणा किंवा कफ दोषाने त्रस्त असाल तर चुकूनही दही खाऊ नका. आयुर्वेदानुसार दही हे कोणत्याही फळांमध्ये मिसळूनही खाऊ नका. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तोटे

असे म्हटले जाते की समजा तुमची पचनक्रिया कमकुवत असल्यास तुम्ही रोज दही सेवन करणे टाळावे. समजा तुम्ही पचनसंस्था नीट काम करत नसेल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागेल. परंतु हे लक्षात घ्या की रोज एक कप पेक्षा जास्त दही खाल्ले तर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार आहे. समजा तुम्ही केवळ एक कप दही खाल्ले तर ते तुमचे नुकसान होत नाही.