आरोग्य

Health Update : नका घेऊ टेन्शन शरीरातील नुकसानदायक कोलेस्टेरॉलचे! हे घरगुती उपाय करतील तुम्हाला मदत

Published by
Ajay Patil

Health Update :- प्रत्येक जण जगत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खूप सजग असतात. कोरोना कालावधीनंतर तर प्रत्येक जण आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक झाले असून अनेक प्रकारचे आरोग्य विषयक  काळजी मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. सध्या आपला दैनंदिन रुटीन असो किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी याकडे देखील आता बारकाईने लक्ष दिले जाते. परंतु तरीदेखील बऱ्याच जणांना हृदयरोग, रक्तदाब तसेच हाय ब्लड प्रेशर यासारख्या समस्या दिसून येतात.

आपली दैनंदिन जीवनशैली तसेच आहाराच्या सवयी इत्यादी बाबींचा यावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. या सर्व बाबींमध्ये जर आपण संतुलन ठेवले नाही तर  आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलसाठी खर्च करायला लागतो. यामुळे काही खर्च करायला लागेल यापेक्षा काळजी घेणे खूप गरजेचे असून या माध्यमातूनच आपण अनेक शरीराला नुकसानदायक गोष्टी नियंत्रणात आणू शकतो.

तसेच नुकसानदायक म्हटले तर शरीरामधील वाढते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे देखील एक मोठी समस्या असून बऱ्याचदा हृदयरोगाचे प्रमुख कारण हेच असते. या अशा सगळ्या बाबींवर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर आपल्यासाठी खूप हितकारक असा ठरतो. आपण कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीने विचार केला तर नैसर्गिक औषधी वनस्पतींच्या सहाय्याने तुम्ही शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतात.

एका मीडिया रिपोर्टचा विचार केला तर यामध्ये दिलेल्या औषधी वनस्पतींच्या माहितीनुसार औषधी वनस्पतींमुळे रक्तवाहिन्यांमधील नुकसानकारक कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकते याबाबतीतलीच महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत.

 औषधी वनस्पती करतील रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी

1- मेथी आपण जर अनेक अभ्यास पाहिले तर यामध्ये मेथीच्या बिया आणि मेथीची पाने यांच्यामध्ये शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करणारे गुणधर्म असून खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे व चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास देखील ही मदत करते.

2- तुळस ज्या व्यक्तींना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे अशा रुग्णांकरिता तुळशीची पाने हा एक खूप चांगला पद्धतीचा पर्याय असून या पानांमध्ये प्रकारचे औषधी तेल असल्यामुळे ते ट्रायग्लीसराईड व कोलेस्ट्रॉलचे पातळी कमी करण्यास खूप मदत करते. दररोज कमीत कमी चार ते पाच ताजी आणि कच्ची तुळशीची पाने खाल्ली तर खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

3- कढीपत्ता कढीपत्ता देखील हाय कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरिता हे एक उपयुक्त असे नैसर्गिक वनस्पती आहे. कढीपत्त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट हाय कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते.

4- आवळा हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरिता आवळा खाणे खूप फायद्याचे असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये देखील सांगण्यात आले आहे. अनेक अभ्यासाच्या माध्यमातून देखील हे सिद्ध झाले आहे. दररोज जर कमीत कमी एक आवळा खाल्ला किंवा आवळ्याचा रस सेवन केला तरी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

5- कोथिंबीर कोथिंबीर  जवळजवळ आपण दररोजच्या आहारामध्ये वापरतोच. ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे अशा पेशंटसाठी कोथिंबीर खूप फायद्याचे आहे. कोथिंबीर मध्ये असलेले कॅरोटीनॉईड शरीरातील सूज आणि लालसरपणा कमी करण्यास देखील फायदेशीर असून त्यामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे देखील गुणधर्म आहेत.

पण तरी देखील जर कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे व त्यानुसारच आहारात बदल करणे गरजेचे आहे.

 

Ajay Patil