Categories: आरोग्य

महिलांसाठी वेदनादायी परंतु अति महत्वाच्या मासिक पाळी संदर्भात जाणून घ्या ‘ह्या’ अत्यंत महत्वाच्या गोष्टी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- मासिक पाळी म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. कधी कधी काही महिन्यांपर्यंत पाळी न येणं तर कधी २१ दिवसांच्या अगोदरच रक्तस्राव सुरू होणं, अशा प्रकारच्या तक्रारी तर नेहमीच्याच.

कुठल्याही स्त्रीची मातृत्वाचा पराक्रम गाजवण्याची सुरवात एका सुंदर प्रक्रियेतून होते ती प्रक्रिया म्हणजेच तिला येणारी मासिक पाळी ! परंतु स्त्रीची हीच मासिक पाळी आपल्या समाजात अपवित्र समजल्या जाते.

आपण स्वतः ला विचारांनी कितीही पुरस्कृत समजत असलो तरही समाजातील एक वर्ग धार्मिकतेच्या नावाखाली, देवानेच स्त्रीला प्रदान केलेल्या या सुंदर प्रक्रियेला अपवित्रतेचा टॅग लावून मोकळा होतो.

एवढेच काय तर सध्याच्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या आपल्या समाजात मासिक पाळीच्या संदर्भात उघडपणे बोलल्या जात नाही. स्त्रिया स्वतः देखील कितीतरी वेळेस या विषयावर बोलण्याच टाळाटाळ करतात. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात काही महत्वाच्या गोष्टी

१) आपल्या शरीराची कुवत ओळखा :- सामान्यत: मासिक पाळी दरम्यान मुलींच्या शरीरातील मेटाबॉलिझम संथ होते. यामुळे पोटात गॅस निर्माण होऊ शकतो किंवा अपचनालाही सामोरे जावे लागू शकते. मासिक पाळी दरम्यान हा त्रास टाळायचा असेल तर मुलींनी आपल्या आहारातील काही विशेष गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. आहार हा अगदी साधा आणि सात्विक असावा. गरम पडणारे पदार्थ खाऊ नये. चमचमीत पदार्थ टाळावेत.

२) या वेदनादायी गोष्टी टाळा :- मासिक पाळी असताना खारट पदार्थ खाऊ नयेत आणि खारट फळांपासून तर पूर्णपणे लांब राहावे. संत्री, मोसंबी, अननस आणि टोमेटो या फळांचे सेवन करू नये. कारण यांच्यात सायट्रिक अॅसिड असतं जे शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं. मासिक पाळी दरम्यान मात्र हे अॅसिड वेदना वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं.

३) हे दोन पदार्थ खाण्याचे टाळा :- मासिक पाळी दरम्यान केळी आणि दही अजिबातच खाऊ नयेत. यांचे सेवन केल्याने काही मिनिटांतच पोटात वेदना सुरु होतात आणि क्रॅम्प्सची समस्या सुद्धा उदभवू शकते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान केळी आणि दही खायचे नाहीत हि गोष्ट कधीच विसरू नका आणि ज्यांना माहित नाही त्यांनाही सांगा.

४) फायबरयुक्त आहार :- मासिक पाळीमध्ये शरीरातील पचन क्रिया नीट असेल तर जास्त त्रास होत नाही. त्यामुळे अशा काळात मुलींनी फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. हा आहार घेतल्याने तुम्हाला दिवसभर उर्जा मिळत राहते.

पचनक्रिया ठीक काम करत राहते आणि गॅसची समस्या देखील उद्भवत नाही. डाळ ओट्स, पोहे, मुग डाळीची खिचडी, मुग मसूरची डाळ आणि चपाती सारख्या साध्या आहाराचे सेवन करावे. या पदार्थांचे पचन अगदी नीट होते आणि पोटात होणारी वेदना देखील होत नाही.

५) बी जीवनसत्व घ्या :- मासिक पाळीच्या दरम्यान मुलींनी जीवनसत्त्व ‘ब’ ने संपन्न असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करायला हवे. असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने मासिक पाळी दरम्यान त्यांचा खूप लाभ होतो. रात्रीचे खजूर पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी खावे.

हे नियमित रुपात केल्यास मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या सर्व समस्या कायमच्या बंद होऊ शकतात. दुसरा पदार्थ आहे मखाना! हे तुम्ही तुम्हाला हवे तसे खाऊ शकता. यात मोठ्या प्रमाणावर लोह असते. लोह शरीरातील ऑक्सिजनचा स्तर वाढवतं यामुळे वेदनेत आराम मिळतो.

काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकता.:-

१. रात्रभर सफेद तीळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या.

२. जीऱ्याचं पाणी पिल्यानं मासिक पाळी नियंत्रणात राहते… सोबतच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो. जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचं दररोज सेवन करा.

३. कच्ची पपई खाल्लानं तुमच्या मासिक पाळी संदर्भात अनेक तक्रारी दूर होतील. यामध्ये भरपूर पोषण, अॅन्टीऑक्सिडंट असतात.

अहमदनगर लाईव्ह 24