Home Remedies For Cough : खोकल्याचा त्रास होईल झटक्यात गायब, वापर हे घरगुती उपाय..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Remedies For Cough : थंडीची नुकतीच सुरुवात झाली आहे.अनेकदा थंडीमुळे खोकल्याची समस्या निर्माण होते. मात्र या खोकल्यापासून तुम्ही अगदी सोप्या घरगुती उपायांनी सुटका मिळवू शकता. यामुळे जर तुम्हालाही थंडीमध्ये होणाऱ्या खोकल्यापासून आराम हवा असेल तर पूवुधील घरगुती उपाय तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.

कोमट पाण्यात मध

कोमट पाणी आणि मध खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. रात्री कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच मध हे वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरते.

हळदीचे दूध

हळद हा एक आयुर्वेदिक घटक असून, अनेक आजारांवर हा उत्तम उपाय ठरतो. मात्र खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आपण दुधामध्ये हळद मिक्स करून हळदीचे दूध पिल्यास खूप फायदे होतात. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जे तुमच्या शरीराला बॅक्टेरियापासून वाचवते. यामुळेच हे दूध खोकल्याबरोबरच सर्दीमध्येही फायदेशीर ठरते.

आले

खोकला दूर करण्यासाठी आले खूप फायदेशीर आहे. आल्याला बारीक ते गरम पाण्यामध्ये उकळून घेतले तर आपल्याला खोकल्यापासून अराम मिळतो. दिवसातून किमान दोन वेळा हे पाणी पिल्यास आपल्याला फायदेशीर ठरते.

लसूण

खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे. यासाठी लसणाच्या दोन-तीन पाकळ्या पाण्यात उकळून त्यात कॅरमच्या बिया टाका. यानंतर त्यात मध मिसळून सेवन करा. अशा प्रकारे लसूण खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करतो. लसूण खाल्ल्याने श्वसनाच्या आजारांपासून आराम मिळतो.

काळी मिरी

२-३ काळी मिरी बारीक करून त्यात मध मिसळावा. याच्या सेवनाने तुम्हाला लगेच अराम मिळतो.

दरम्यान, खोक्याच्या त्रासापासून वरील घरगुती उपायांनी सह अराम मिळतो.