Digestion Timing Of Liquor:- समाजामध्ये बरेच जणांना दारूचे व्यसन असल्याचे दिसून येते. यामध्ये काही लोक हे दररोज पिणारे असतात तर काही व्यक्ती हे विशिष्ट प्रसंगी किंवा एखाद्या सेलिब्रेशन राहिले तेव्हा पार्टी प्रसंगी दारू पितात. दारू पिणे हे आरोग्यासाठी घातक आहे व हे त्रिकालबाधित सत्य आहे.
साधारणपणे दारू पिल्यानंतर व्यक्तीचे सगळेच हावभाव बदलतात व अशा प्रकारचा दारूचा अंमल व्यक्तीवर काही कालावधी पुरता दिसून येतो व नंतर व्यक्ती नॉर्मल होते असे साधारणपणे आपल्याला दिसते.
दारू पिल्यानंतर शरीरात किती वेळ राहते व कोणत्या भागात जमा होते? हे जर कोणाला विचारले तर बऱ्याच लोकांना याबद्दल काहीच माहिती नसेल किंवा याबद्दल काही सांगता येणार नाही.
दारू पिल्यानंतर शरीरात कोणत्या ठिकाणी किती वेळ राहते?
आपल्याला माहिती आहे आपण जे काही खाद्यपदार्थ खातो त्याला पचायला देखील एक वेळ लागतो. यामध्ये तुम्ही भाजी पोळी खाल किंवा मांसाहार केला तर यामध्ये पचण्याची वेळ वेगवेगळी असते. परंतु बऱ्याच जणांना वाटते की दारू जर प्यायली तर ती घाम व लघवीच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकली जाते व शरीरात राहत नाही.
पण जर सत्य परिस्थिती पाहिली तर दारूला देखील पचायला वेळ लागतो व काही प्रमाणात नशा उतरली तरी देखील दारू शरीराच्या ठराविक भागांमध्ये साचते व नंतर तिची पचायची प्रक्रिया सुरू होते. असे म्हटले जाते की दारू पिल्यानंतर ती शरीरात गेल्यानंतर अगदी 30 सेकंदात नंतर रक्तप्रवाहामध्ये मिसळते व संपूर्ण शरीरात पसरली जाते.
जेव्हा ती पोटामध्ये जाते तेव्हा ती काही वेळाने घाम व लघवीच्या माध्यमातून बाहेर टाकली जाते. परंतु काही प्रमाणामध्ये ती पोटात राहते व पोटात राहिलेल्या दारूपैकी 90% दारू ही लिव्हर आणि आतड्यांमध्ये जमा होते व नंतर पचनक्रिया सुरू होते.
याबद्दलचे जर रिपोर्ट आपण बघितले तर दारू पिल्यानंतर ती साधारणपणे 72 तासापर्यंत शरीरात राहते व हे शरीरात राहण्याचे प्रमाण दारू किती प्रमाणात पिले आहात किंवा दारूची गुणवत्ता आणि पिण्याची पद्धत इत्यादीवर देखील अवलंबून असते.
दारू पिले आहात की नाही याच्यासाठीच्या काही चाचण्या येतात व या चाचणीनुसार बघितले तर रक्ताची चाचणी केली तर दारूचे प्रमाण सहा तासांपर्यंत देखील कळु शकते तसेच श्वासोशवासाची तपासणी केली असता त्या माध्यमातून 24 तास कालावधीपर्यंत आपल्याला दारूचे प्रमाण दिसून येते व लघवीची चाचणी केली तर 72 तास व लाळेच्या चाचणीत 12 ते 24 तास दारूचे प्रमाण कळतं.
यावरून आपल्याला कळते की दारू पचायला एक ठराविक कालावधी द्यावा लागतो. त्यामुळे जे लोक दररोज दारू पीत असतील त्यांच्या शरीरासाठी हे नक्कीच नुकसानदायक आहे. त्यामुळे दारूपासून चार हात लांब राहिलेले स्वतःसाठी चांगले ठरू शकते.