Blood Sugar : जर साखर नियंत्रण ठेवायचे असेल फक्त ‘या’ गोष्टींपासून रहा दूर! महिनाभरात दिसेल फरक

Ahmednagarlive24 office
Published:
Blood Sugar

Blood Sugar :- शारीरिक आरोग्यावर आपल्या दैनंदिन सवयी आणि दैनंदिन जो काही रुटीन असतो याचा खूप मोठा परिणाम होताना दिसून येतो. कधी कधी आपल्या सवयींचा विपरीत परिणाम होतो तर कधी सकारात्मक परिणाम देखील दिसतो.

त्यामुळे आपला दैनंदिन रुटीन हा नियमित असणे खूप गरजेचे असते. सध्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग तसेच मधुमेहासारख्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये जर आपण मधुमेह अर्थात डायबिटीस या आजाराच्या अनुषंगाने बघितले तर अगदी तरुणाईला देखील या आजाराचा विळखा बसताना दिसून येत आहे.

खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयी तसेच व्यायामाचा अभाव, जंक फूडचे मोठ्या प्रमाणावर केले जाणारे सेवन व बिघडलेली जीवनशैली इत्यादी गोष्टींमुळे मधुमेह बळावतो. तसेच मधुमेहामध्ये साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे देखील खूप गरजेचे असते.

तुम्हाला देखील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रनात ठेवायचे असेल तर तुम्हाला काही सवयींमध्ये सुधारणा करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्यापासून तुम्ही दूर राहिल्यास मधुमेहाच्या रुग्णांना खूप मोठा फायदा होतो व साखरेवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होते.

या सवयी टाळा आणि साखर नियंत्रणात ठेवा

1- उशिरा जेवणाची सवय सोडा- यापैकी बऱ्याच जणांना रात्री उशिरा जेवण्याची सवय आहे किंवा असते. अशा प्रकारची सवय तुम्हाला देखील असेल तर तात्काळ सोडणे खूप गरजेचे आहे. आपण रात्री उशिरा जेवण केले तर अन्नाचे पचन नीट होत नाही व त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. ही सवय हृदय विकाराचा झटका तसेच मधुमेह इत्यादी आजारांना निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे संध्याकाळी सातच्या आधी जेवण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

2- जेवण केल्यानंतर लगेच झोपणे टाळा- शरीरामध्ये साखरेची पातळी अधिक असेल तर जीवनशैलीकडे खूप लक्ष देण्याची गरज असते. समजा तुम्ही जेवण केल्यावर लगेच झोपलात तर शरीरातील कफ दोष वाढतो व याचा परिणाम साखरेच्या पातळीवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवण करून लगेच न झोपता कमीत कमी दोन ते तीन तासानंतरच झोपणे फायद्याचे ठरते.

3- साखर व मैद्यापासून दूर राहणे फायद्याचे- डायबिटीसच्या रुग्णांनी साखर, मैदा तसेच ग्लुटेनयुक्त पदार्थ व प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहणेच फायद्याचे ठरते. हे पदार्थ आहारामध्ये समाविष्ट केले तर मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता वाढते. वर उल्लेख केलेल्या सर्व पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज असतात यामुळे साखरेची पातळी वाढू शकते.

4- औषधे वेळेवर घेणे- तुम्हाला जर मधुमेहाची समस्या टाळायची असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन रुटीनवर खूप लक्ष देणे गरजेचे आहे. यासोबत तुम्ही घेत असलेली औषधे वेळेवर घेणे देखील खूप फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe