Diabetes care : भारतातील सुमारे २.९ दशलक्ष लोक मधुमेहग्रस्त आहेत, ही रुग्णसंख्या २०४५ पर्यंत अंदाजे १३४ दशलक्षांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. मधुमेह रुग्णांचे पाय ही मधुमेहाची सर्वात सामान्य आणि गंभीर स्वरूपाची सूक्ष्म रक्तवहिन्यासंबंधी गुंतागुंत आहे.
मधुमेहींनी त्यांच्या पायाच्या देखभालीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहे. उष्ण हवामान, वाढलेले क्रियाकलाप आणि घामामुळे पायांच्या समस्या अधिक सामान्य होऊ शकतात. मधुमेहींसाठी पायांच्या किरकोळ समस्यादेखील गंभीर रूप धारण करून गुंतागुंत निर्माण करू शकतात.
पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याव्यतिरिक्त आरामदायी पादत्राणे वापरणे आणि पायांचे सूर्यापासून संरक्षण करणे, भविष्यातील पायांच्या समस्या टाळण्यासाठी ग्लुकोजच्या पातळीचे नियमितपणे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.
या सोप्या टिपांचे अनुसरण करून मधुमेही निरोगी आणि आनंदी पायांची सुनिश्चितता करू शकतात, असे आरोग्यतज्ज्ञ डॉ. संजय अग्रवाल यांनी सांगितले. घाम येणे समस्या आहे. त्यामुळे क्रीडापटूच्या पायाला बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
हे टाळण्यासाठी स्वतःचे पाय स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करावी. पाय दररोज सौम्य साबण आणि पाण्याने धुवून पूर्णपणे वाळवावे. विशेषतः पायांच्या बोटांच्या बेचक्यांमध्ये अधिक घाम येत असल्यास दुपारी स्वतःचे मोजे बदला किंवा अँटिफंगल फूट पावडर वापरावी.
पावलांना गारवा वाटावा म्हणून सँडल किंवा फ्लिप फ्लॉप घालण्याचा मोह होतो. तथापि, मधुमेहींच्या दृष्टीने या प्रकारची पादत्राणे समस्या निर्माण करणारी असू शकतात. थोड्या आरामाकरिता मोठ्या दुखापतीला आमंत्रण मिळू शकते.
त्याऐवजी, पायाला व्यवस्थित बसणारे आणि पुरेसा आधार देणाऱ्या पादत्राणांची निवड करा. कॅन्व्हास किंवा चामड्यासारखे पायांत हवा खेळती ठेवणाऱ्या पादत्राणांना प्राधान्य द्या. घाम आणणारे, आद्रर्ता निर्माण करणारे सिंथेटीक प्रकार टाळा, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.
एकंदर आरोग्यासाठी व्यायाम उत्तम ठरतो. अगदी पायाच्या आरोग्यासाठीही तो महत्त्वाचा आहे. नियमित शारीरिक हालचालीने रक्ताभिसरण सुधारते आणि न्यूरोपॅथीसारख्या उपचार पद्धती पायाच्या समस्या टाळण्यास मदत करतात.
तथापि, आपल्या वैयक्तिक गरजांसाठी सुरक्षित आणि योग्य अशा क्रियाकलापांची निवड करणे महत्त्वाचे आहे. सर्वात योग्य व्यायाम प्लानची चर्चा स्वतःच्या आरोग्य सेवा प्रदात्याशी करा, योग्य पादत्राणे आणि मोजे वापरा.