Health News : मागच्या काही आठवड्यांपासून डोळ्यांची साथ सुरू असून, ही साथ आता काहीशी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. जवळपास प्रत्येक नेत्रतज्ञाकडे रोजच आठ-दहा रुग्ण साथीच्या आजारावरील उपचारासाठी येत असल्याचे सांगण्यात आले.
ही साथ ‘व्हायरल कन्जक्टिव्हायटस’ या डोळ्याच्या विषाणूजन्य आजारांमुळे आहे आणि लवकर तसेच योग्य उपचार व काळजी घेतल्यास डोळे बरे होतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. द
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात डोळ्यांची साथ पसरताना दिसून येत आहे. कंजक्टिवायटिस या डोळ्यांच्या विकाराने अनेक जण त्रस्त असल्याचे आढळून येत आहेत. कन्जक्टिवायटिस हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो आणि बॅक्टेरिया किंवा वायरस सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा आजार फैलावतो.
मात्र, डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा यामागील मुख्य कारण आहे, असे डॉक्टर सांगत आहेत. डॉक्टरांच्या मते, वातावरणातील बदलांसह कॉम्प्युटरवर सतत काम केल्याने, प्रदुषणामुळे डोळ्याच्या तक्रारी सातत्याने वाढल्या आहेत
यात डोळे दुखणे, चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग होण्याचा त्रास जाणवतोय. त्यामुळे शारीरिक आरोग्यासह डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेच आहे. परंतु, अनेक जण डोळ्याच्या आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात.
यामुळेच डोळ्यांना संसर्ग होण्याची भिती अधिक वाढतेय. त्यात आता कंजक्टिवायटीस हा आजार बळावत असल्याने पुणेकरांनी डोळ्यांची अधिक काळजी करणं गरजेचं आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा एकमेकांशी येणाऱ्या दैनंदिनी संपकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण अधिक आहे.