आरोग्य

Health Tips : तुमचे हृदय कमजोर आहे का ? जाणून घ्या ह्या ३ सोप्या पॉईंट्सने

Published by
Ahmednagarlive24 Office

Health Tips : शहरा त राहणारा असो अथवा खेड्यात राहणारा असो… प्रत्येकाची जीवनशैली आज बदललेली दिसते. पायाला घडाळ्याचे काटे लावून जो तो धावताना दिसतो. मात्र यामुळे आपल्या शरीरस्वास्थ्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते.

त्यामुळे अनेकविध आजार निर्माण होताना दिसतात. अनेकांना हृदयाशी संबंधित आजार होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. अगदी लहान वयातही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या चिंतन करायला भाग पाडत आहेत. असे का होत आहे ?

याचा विचार केला तर बाहेरचे पदार्थ अतिप्रमाणात खाणे, शरीराची हालचाल न करणे, व्यायाम न करणे, टेन्शन, ताणतणाव अशा अनेक गोष्टींमुळे हृदयाशी संबंधित आजार निर्माण होतात. तसेच लठ्ठपणा, ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. अशावेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

काही लक्षणे जी हृदय कमजोर असल्याचे सांगतात

■जर छातीत दुखत असेल किंवा छातीवर दबाव आल्यासारखे वाटत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून योग्य तो उपचार घ्यावा. कारण हे हृदयविकारचे महत्त्वाचे लक्षण आहे. तर वेळीच डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घ्या.

■बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. बीपी वाढतो तेव्हा ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. बीपी वाढल्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी बीपी चेक करायला हवा, त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य तो उपचार करावा.

■छातीत दुखणे किंवा छातीत जळजळ होत असेल तर तुमचे हृदय कमकुवत असू शकते. खूप जास्त घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या निर्माण होत असतील तर ती हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.

Ahmednagarlive24 Office