आरोग्य

कर्करोगाची पुनरावृत्ती टाळणे आता होणार शक्य ! उपचार पूर्ण झाल्यानंतरही कर्करोग का पसरतो? टाटांच्या डॉक्टरांना संशोधनात मिळाले उत्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Health News : कर्करोगावर उपचार केल्यानंतरही अनेक लोकांमध्ये कर्करोग परत होतो. यामागचे कारण काय? टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून या प्रश्‍नाचे उत्तर शोधले आहे.

सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की प्राथमिक अभ्यासात असे पुरावे मिळाले आहेत की विशिष्ट उपाय कर्करोगाच्या उपचाराचे परिणाम सुधारू शकतात आणि उपचारादरम्यान आरोग्य समस्या कमी करू शकतात.

कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी गेमचेंजर संशोधन खारघर, टाटा हॉस्पिटलच्या अँडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआरएसी ) हॉस्पिटलच्या ट्रान्सलेशनल रिसर्च लॅबोरेटरीचे प्रा. डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

डॉ. मित्रा यांनी सांगितले की, कॅन्सरचे उपचार पूर्ण झाल्यानंतरही हा आजार बरा होण्याऐवजी शरीराच्या इतर भागात कसा पसरतो? हा प्रश्‍न शोधण्यासाठी आम्ही उंदरांवर संशोधन केले. मानवी कर्करोगाच्या पेशी उंदरांमध्ये घालण्यात आल्या. त्यानंतर कॅन्सरच्या पेशींमुळे उंदरांमध्ये ट्यूमर तयार झाला.

आम्ही त्यांच्यावर रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले, परंतु आम्हाला आढळले की रेडिएशन आणि केमो दिल्यानंतर कर्करोगाच्या पेशी नष्ट झाल्या आणि त्यांचे लहान तुकडे झाले.

या मरणार्‍्या कर्करोगाच्या पेशीमधील क्रोमॅटिन कण (क्रोमोझोनचे तुकडे ) रक्‍तवाहिन्यांद्वारे शरीराच्या इतर भागात पोहोचतात. या गुणसूत्रांचे तुकडे शरीरातील चांगल्या पेशींमध्ये मिसळतात आणि त्यांचे कर्करोगाच्या पेशींमध्ये रूपांतर करतात. कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊनही शेवटी का परत येतात, हे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

आता या समस्येवर उपाय काय? म्हणून आम्ही काही उंदरांना रेस्वेराट्रोल (फळांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट ) दिले आणि कॉपरच्या एकत्रित प्रो-ऑक्सिडंट गोळ्या दिल्या. बरील गोळ्या चांगल्या पेशींचे कर्करोगाच्या पेशींमध्ये रूपांतर करणाऱ्या क्रोमोझोन्सला निष्प्रभ करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात.

याने होतात कर्करोगाचे दुष्परिणाम कमी

टाटाचे अस्थिमज्जा प्रत्यारोपण विशेषज्ञ डॉ. नवीन खत्री यांच्या मते, अल्सरच्या उपचारादरम्यान कॉपर-रेस्वेराट्रॉल घेतल्याने समस्येपासून बराच आराम मिळतो.

तोडाच्या कर्करोगावर देखील तांबे उपयुक्त

रेस्वेराट्रोल गोळ्या दिल्यानंतर कर्करोग पेशीची तीव्रता कमी झाली. कॅन्सर रुग्णांच्या उपचारादरम्यान त्यांच्या हातावरील त्वचा जाऊ लागते. त्याचे साइड इफेक्ट्स कमी करण्यासाठी देखील याचा वापर चांगला होत असल्याचे दिसून आले आहे.

ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांमध्ये देखील तांबे उपयुक्त –

रेस्वेराट्रोल सेवनाने चांगले परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

उपचार सुधारण्यास मदत होईल

टाटा मेमोरिअल सेटरचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले की, कर्करोगाच्या उपचारात सुधारणा कशी करता येईल यावर विचार करण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.

उपचारादरम्यान ७० टक्के सुचारणा झाल्यास पातळी ८० किंवा ९० टक्क्यांपर्यंत वाढवता येते. डॉ. मित्रा यांच्या या अभ्यासामुळे केवळ आम्हालाच नाही तर जगभरातील कर्करोगावरील उपचार देणाऱ्या लोकांनाही सध्याच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल.

ही समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय

टाटा मेमोरियल सेंटरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले की, समस्येचे मूळ शोधण्यासोबतच ते सोडवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

तांबे रेस्वेराट्रोलसाठी घरगुती उपाय आहेत.हे कर्करोगावरील उपचार सुधारण्यासाठी आणि उपचारादरम्यान दुष्परिणाम कमी करण्यासाठी देखील योग्य आहे.

Ahmednagarlive24 Office