IVF Treatment Tips : सावधान! IVF उपचारादरम्यान टाळा ‘या’ 5 चुका, अन्यथा गर्भधारणा होईल अयशस्वी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IVF Treatment Tips : आजकाल जगात अनेक प्रगत तंत्रज्ञान आले आहे. ज्या जोडप्यांना नैसर्गिक गर्भधारणा होत नाही अशी जोडपी IVF उपचाराचा अवलंब करत आहेत. मात्र IVF उपचार ही एक सोपी पद्धत नसून ती एक खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.

IVF उपचार करून गर्भधारणा केलेल्या स्त्रियांना अनेक विशेष प्रकारची काळजी घ्यावी लागते. यावेळी स्त्रियांना आरोग्याची, जीवनशैलीची आणि आहाराची योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत असतो.

त्यामुळे ज्या महिला IVF उपचार घेत आहेत त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. तसेच सकस आहार घेणे फायदेशीर घेणे फायदेशीर ठरत असते. तसेच अशा महिलांनी कसल्याही प्रकारचा ताण न घेणे त्यांच्यासाठी फायदेशीर असते.

IVF उपचार घेतलेल्या महिलांनी खालील गोष्टी करणे टाळावे

खूप ताण घेणे

IVF प्रणालीद्वारे गर्भधारणा करणे ही एक खुप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. IVF द्वारे गर्भधारणा करायची असेल तर सतत हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतात. तसेच अनेक प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतात आणि इंजेक्शन्स दिली जातात.

त्यामुळे काही स्त्रिया अशा त्रासांमुळे खूप ताण घेत असतात. मात्र IVF द्वारे उपचार सुरु असतील तर स्त्रियांनी कसल्याही प्रकारचा ताण न घेणे फायदेशीर ठरते. कारण अशा दिवसांमध्ये स्त्रियांनी मन शांत ठेऊन आराम करणे गरजेचे असते. जर सतत ताण घेतला तर IVF गर्भधारणा अयशस्वी ठरू शकते.

आयव्हीएफ दिनचर्येची काळजी न घेणे

आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या महिलांना नेहमी आरोग्य तज्ज्ञांकडून आयव्हीएफ दिनचर्या पाळण्याचा सल्ला दिला जात असतो. काही वेळा महिला घरातील कामे आणि इतर गोष्टींमुळे आयव्हीएफ दिनचर्येची काळजी घेत नाहीत.

अनेकदा महिला चुकीचा आहार, चुकीची जीवनशैली आणि अस्वस्थ सवयी यांचा अवलंब करत असतात. त्यामुळे या सर्व सवयी आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या महिलांना धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे गरजेचे असते.

तुमच्या आरोग्याबद्दल सतत गुगलवर पाहू नका

सध्या अनेकजण आरोग्याबद्दल आणि इतर सर्व गोष्टी गुगलवर पाहत असतात. तसेच आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे न जाता गुगलवर सर्च करून गुगलचा सल्ला घेत असतात. मात्र आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या महिलांनी असे करणे धोक्याचे ठरू शकते. जर आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या महिलांना काही त्रास जाणवला तर लगेचच आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सतत विश्रांती घेणे

अनेक महिला गरोदरपणात सतत विश्रांती घेत असतात. मात्र सतत विश्रांती घेणे IVF उपचार घेणाऱ्या महिलांना हानिकारक ठरू शकते. IVF उपचारादरम्यान महिलांना थकवा जाणवत असतो. त्यामुळे त्या सतत विश्रांती घेण्यास प्राधान्य देत असतात. मात्र महिलांनी असे न करता सतत घरातील छोटी छोटी कामे करणे गरजेचे आहे तसेच संवाद साधने देखील महत्वाचे आहे.

उपचारासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा

ज्या महिला नैसर्गिकरित्या आई होऊ शकत नाहीत अशा महिला अनेकदा औषधे आणि इतर गोष्टीचा अवलंब करत असतात. मात्र अशा गोष्टी करण्यामध्ये वय वाढत असते. त्यामुळे जास्त वयामध्ये आयव्हीएफ उपचार अयशस्वी ठरू शकतो. त्यामुळे महिलांनी योग्य वयामध्ये आयव्हीएफ उपचार करणे आवश्यक आहे.