आरोग्य

लॅपटॉप, मोबाईलमुळे डोळ्याला काय त्रास होतो ? समोर आली ‘ही’ माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Health News : हल्लीच्या काळात स्मार्टफोन आणि लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा वापर अतिशय वाढला आहे. त्यामुळे आपला अॅव्हरेज स्क्रीन टाइम वाढला आहे. त्याचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो, हे एव्हाना आपल्याला माहीत झाले आहे. परंतु हा परिणाम नेमका कसा होतो याचा उलगडा नव्या संशोधनातून झाला आहे.

ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सिटीतील असिस्टंट प्रोफेसर डॉ. नॉमा मोजराद सांगतात की, गॅझेट्सच्या अतिवापरामुळे आपली नजर कमजोर होते. याचे कारण म्हणजे आपण जन्मतःच दूरदर्शी असतो.

म्हणजेच आपल्या जवळ असलेल्या वस्तू जेवढ्या स्पष्ट दिसतात, त्याहून जास्त स्पष्ट तुलनेने लांब अंतरावर असलेल्या वस्तू अधिक स्पष्ट दिसतात. जसजसे आपले वय वाढत जाते, तसतसे आपले डोळे अचूक दृष्टी मिळवण्यासाठी व्हिज्युएल एन्व्हॉर्नमेंट आणि जेनेटिक सिग्नल्स ग्रहण करू लागतात.

परंतु ज्यांना मायोपिया हा नेत्रविकार असतो, त्या व्यक्ती अशाप्रकारे स्वतःची दृष्टी प्रगल्भ करू शकत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर अशा लोकांच्या डोळ्याची बाहुली आणि रेटिना यांच्यातील अंतर वाढते. नेमके असेच काहीसे स्क्रीन टाइम वाढल्याने होत असते.

Ahmednagarlive24 Office